political party देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

देऊळगाव मही ग्रामपंचायत सरपंचपदी कमल शिंगणे, उपसरपंचपदी मो.आतिक बिनविरोध.

Spread the love

देऊळगाव मही | समर्थ भारत मराठी :

तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या देऊळगाव मही येथील सरपंच वंदना शिंगणे यांनी आपल्या सरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या सरपंच व उपसरपंच पदासाठी दि.२६ रोजी निवडणूक पार पडली यामध्ये सरपंचपदी कमल शिंगणे तर उपसरपंचपदी मो.आतिक यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघात दृष्टीने राजकीय महत्त्व प्राप्त असलेल्या देऊळगाव मही येथील १७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत वर स्व.भास्करराव शिंगणे ग्राम विकास पॅनल चा झेंडा फडकला होता.त्यांच्या गटाला १७ पैकी ११ तर विरोधी गटाला केवळ सहा जागेवर समाधान मानावे लागले होते.सरपंच पद ओबीसी महिलांसाठी राखीव  असल्याने या जागेवर अनेकांनी आपला दावा सांगितला होता.मात्र सरपंच व उपसरपंचपद निवडताना मोठी कसरत पॅनल प्रमुखांना करावी लागली.यावेळी सरपंच व उपसरपंच पद विभागून देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार कमल उमेश शिंगणे यांची बिनविरोध सरपंच पदी निवड झाली.

याप्रसंगी माजी अर्थ व बांधकाम सभापती रियाजखाँन पठाण,माजी सभापती भिकाजी शिंगणे,जेष्ठ नेते राजेंद्र डुंगरवाल, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे,अरविंद शिंगणे,बि.एम.पठाण,तेजराव शिंगणे, रामभाऊ शिंगणे,नितिन शिंगणे,शेख फरहाद,मन्नान पठान, रामकिसन म्हस्के,सुभाष शिंगणे,वासुदेव शिंगणे, रतन रेशवाल,नागोराव शिंगणे,शेखनिसार,सुभाष शिंगणे,रविंद्र इंगळे,कान्हा शिंगणे,भगवान शिंगणे,अशोक पाबळे,सय्यद सईद,संजय शिंगणे,सुनिल मोरे,भास्कर शिंगणे,संजय खरात,धर्मराज खिल्लारे, मोहंमद आशिक,राजेंद्र शिंगणे, अशोक शिंगणे,प्रकाश शिंगणे,दीपक शिंगणे,गणेश शिंगणे रमेश शिंगणे,शेख.मुस्लिम,युनूस कारगिल, माजी सरपंच वंदना शिंगणे, ग्रामपंचायत सदस्य कैकई शिंगणे,सुनिता  इंगळे,शेख.फरजानाबी रब्बानी,वनिता खिल्लारे, संजय खरात,संदीप राऊत,तुळशीराम पंडित,विलास शिंगणे,दिपू शिंगणे,सुनील शिंगणे,जहीर खान,शेख इमरान,शेख उस्मान,शेख बबलू,शेख निसार,शेख वसीम,शेख शगीर, अब्दुल शेख खुद्दुस,शेख इजदान,रवि मुळे,अशोक शिंगणे, विकास शिंगणे,बालू शिंगणे यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन मंडळ अधिकारी वि.रा.हिवरे,ग्रामविकास अधिकारी व्ही.पी. चेके,तलाठी संदीप वायाळ,अंनता इंगळे,प्रभाकर झिने,मिलन शेळके, रंगा शिंगणे,दाऊत पठाण, पुष्पा शिंगणे यांनी काम पाहिले.

चार सदस्य गैरहजर:-

१७ सदस्य असलेल्या ग्रामपंचायत मध्ये सरपंच व उपसरपंच पदासाठी २६ रोजी निवडणूक होणार असल्याने निवडणूक अधिकाऱ्यांनी सर्व ग्रामपंचायत सदस्यांना याबाबत नोटीस काढून सूचना दिली होती मात्र चार सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत भाग न घेता आपली अनुपस्थिती दर्शविली.

“स्वर्गवासी भास्करराव शिंगणे व आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग परिसरात आहे. देऊळगाव मही तालुक्यातील मोठी बाजारपेठ देखील आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आ. डॉ.राजेंद्र शिंगणे व गावातील वरिष्ठ नेत्यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मार्गी लावल्या जातील. तर यावेळी गावकऱ्यांनी जो विश्वास दाखवला आहे.त्याला तडा जाऊ देणार नाही.”

कमल शिंगणे (नवनियुक्त सरपंच) 

वाढदिवशीच मिळाल मोठं गिफ्ट :-

कमल शिंगणे या देऊळगाव मही येथे एका खाजगी संस्थेवर  अध्यापनाचे कार्य करतात व त्या उच्चशिक्षित आहेत.त्यांचे पती उमेश शिंगणे हे देखील उच्चशिक्षित व आदर्श शेतकरी आहे.आज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असणाऱ्या देऊळगाव महीच्या सरपंचपदी  कमल शिंगणे यांची वर्णी लागली आणि योगायोगाने त्यांचा आज वाढदिवस आहे त्यामुळे गावकऱ्यांच्या वतीने वाढदिवसाला मोठा गिफ्ट कमल शिंगणे यांना मिळालं आहे.

error: Content is protected !!