political party जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

भाजयुमो च्या तालुकाध्यक्षपदी परीक्षित ठाकरे यांची नियुक्ती.

Spread the love

जळगांव जामोद तालुक़ा व शहर कार्यकारिणी घोषित.

जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :

भाजपाचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील वाघ,शहर अध्यक्ष कैलास पाटील यांनी आ.डॉ. संजय कुटे,जिल्हा भाजपाचे अध्यक्ष सचिन देशमुख यांच्या निर्देशानुसार तालुक्याची १८० जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे.त्यामध्ये भाजयुमो च्या तालुकाध्यक्षपदी परीक्षित ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

या कार्यकारिणीमध्ये दहा उपाध्यक्ष,पाच सरचिटणीस,तेरा चिटणीस आणि ४६ कायम निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे.तर कैलास पाटील यांनी सुद्धा जळगाव जामोद शहर मंडळाची ५० जनांची जंबो कार्यकारिणी घोषित केली असुन ते स्वतः अध्यक्ष आहेत तर ४ सरचिटनिस,१३ उपाध्यक्ष,सचिव,सदस्य व क़ायम निमंत्रित सदस्य अश्या नियुक्ति केल्या गेल्या.तालुका युवा मोर्चा तालुक़ा अध्यक्ष पदी परिक्षित ठाकरे यांची नेमणूक झाली आहे.

तालुका अध्यक्ष म्हणून प्रकाश पाटील वाघ तर एक कोषाध्यक्ष,एक सहकोषाध्यक्ष आणि एक प्रसिद्धी प्रमुख व उर्वरित सर्व सदस्य मिळून तब्बल १८० जणांना या कार्यकारणीमध्ये स्थान मिळाले आहे.आ.डॉ. संजय कुटे, भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांचा सुद्धा कायम निमंत्रित सदस्यांमध्ये समावेश आहे.

पदाधिकाऱ्यांना त्यांच्या नियुक्ती पत्रांचे वितरण आ.डॉ. संजय कुटे आणि जिल्हा अध्यक्ष सचिन बापू देशमुख यांनी केले.भाजपा पंचायत राज्य जिल्हा समन्वयक बंडू पाटील, गुणवंतराव कापले,चंदाताई पुंडे, राजेंद्र गांधी यांचेसह अपर्णाताई कुटे,अनिता जयस्वाल,लता तायडे,सुचिता उमाळे, रुपाली काळपांडे,सुनीता म्हसाळ,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शाकीर खान, विधानसभा विस्तारक गणेश भोपळे,अभिमन्यू भगत, शेगाव शहर अध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे,शहर अध्यक्ष कैलास पाटील,संतोष दांडगे, भाजयुमोचे परीक्षित ठाकरे,अशोक काळपांडे, अंबादास निंबाळकर व भाजपा महिला मोर्चा भाजपा युवा मोर्चा भाजपा पदाधिकारी व सदस्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!