देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :
वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सविता मुंढे यांना जागतिक महिला दिनानिमित्त वेध फाउंडेशन आयोजित “रणरागिणी नॅशनल अवॉर्ड”साठी निवड करण्यात आली आहे.
८मार्च २०२४ रोजी दुपारी १ वाजता शिवाजीराव देशमुख सभागृह,रामलीला मैदान हिंगोली येथे त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.सविता मुंडे यांनी जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक आक्रमक आंदोलने केली आहेत.त्या माध्यमातून अनेक समस्या मार्गी लागल्या आहेत.वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी वर्णी लागल्यानंतर त्यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला आहे. आक्रमक शैली म्हणून त्यांची ओळख सिंदखेडराजा मतदारसंघात आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन स्वाती मोराळे यांच्या वेध फाउंडेशनने त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे.
Add Comment