बुलढाणा जिल्हा मेहकर

समृद्धि महामार्गावर भीषण अपघातात १ ठार २ जखमी.

Spread the love

रस्त्याच्या कडेला पलटी होऊन जळाला ट्रक.

मेहकर | समर्थ भारत मराठी :

मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर भरधाव ट्रक रस्त्याच्या कडेला पलटी होऊन त्याला अचानक आग लागल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे ही घटना मेहकर इंटरचेंज  पासून काही अंतरावर असलेल्या चायगाव गावाजवळ मुंबई कॉरिडोर मधील चॅनेल नंबर २९० जवळ  सकाळच्या सुमारास घडली आहे

या बाबत प्राप्त माहिती नुसार अज्ञात क्रमांकाचा ट्रक हा समृद्धि महामार्गाने नागपुर वरुन मुंबई कडे चालला होता. सकाळच्या सुमारास ट्रक चालकाला डुलकी लागल्यामुळे भरधाव ट्रक मेहकर इंटरचेंज पासून काही अंतरावर असणाऱ्या चॅनल नंम्बर २९० जवळ महामार्गाच्या कठड्याला तोडून रस्त्याच्या खाली पलटी झाला व त्यामध्ये अचानक आग लागली. यावेळी ट्रक मध्ये तीन जण अडकले होते.अपघाताची माहिती मिळताच समृद्धि वरील जलद कृती दल,ॲम्बुलन्स,अग्निशामक दलाचे वाहन,पोलिस त्याठिकानी पोहोचले त्यांनी तात्काळ आग विझवुन आत मध्ये अडकलेल्या तीन जणांना बाहेर काढले.ट्रक मधील एजाज शाह वय २० वर्ष रा. उत्तर प्रदेश यांचा गंभीररित्या जळाल्यामुळे जागीच मृत्यु झाला होता तर शकील शाह वय ३५ व शोएब अली वय १५  हे दोघे जण आगीने भाजल्यामुळे गंभीर जखमी झाले.गंभीर जखमीना पुढील उपचारासाठी शहरातील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. मृतकाचे शव शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय मेहकर येथे पाठविन्यात आले आहे. या वेळी १०८ रुग्णवाहिकेचे चे डॉ.अशोक पिसे,पायलट प्रदीप पडघान व भगवान राठोड़ तसेच समृद्धि महामार्ग पोलिस व जलद कृती दलाने तात्काळ अपघाताच्या ठिकाणी पोहचत मदत केली.

error: Content is protected !!