देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

वाळू माफिया विरोधात आस्मा मुजावर यांचा कारवाईचा धडाका.

Spread the love

देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :

देऊळगाव राजा तहसीलदारपदी वैशाली डोंगरजाळ व नायब तहसीलदार आस्मा मुजावर यांनी धडक कारवाया केल्या आहेत.नायब तहसीलदार आस्मा मुजावर या तर वाळूमाफियांसाठी कर्दनकाळ  ठरत असून या पंधरवड्यात त्यांनी चार  वाहनावर कारवाई केली आहे. त्यांच्या कारवाईचा धडाका सुरू असल्यामुळे वाळू माफियाचे धाबे दणाणले आहे. 

तालुक्यातील अंढेरा नजीक अवैध वाळू वाहतूक करतांना टिप्पर जप्त करण्यात आले.सदर टिप्पर अंढेरा पोलीस ठाण्यात अटकाव करण्यात आले आहे.तालुक्यात खडकपूर्णा नदी पात्रातून दररोज शेकडो ब्रास वाळू चे अवैध उत्खनन करून जिल्ह्यासह जिल्हा बाहेर वाहतूक करण्यात येते.नायब तहसीलदार अस्मा मुजावर ह्या अवैध वाळू प्रतिबंधक पथकात गस्तीवर असताना सरबा फाट्या नजीक दि.२४ रोजी टिप्पर क्रमांक एम एच २८ बी बी ४७२४ व एम एच २१ए बी ५६५४ हे चिखलीच्या दिशेने जाताना दिसले.  सदर वाहन अडवून चौकशी केली असता अंदाजे चार ब्रास वाळू विना परवाना आढळूनआली. टिप्पर जप्तीची कारवाई करून नायब तहसीलदार आसमा मुजावर यांनी अंढेरा पोलिसात अटकाव केला आहे.ही कार्यवाही नायब तहसिलदार आसमा मुजावर तसेच वाहन चालक कैलास चव्हाण यांनी केली आहे.

error: Content is protected !!