धनगर आरक्षणासाठी केली होती आत्महत्या.
देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :
धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी नरसिंग गायकवाड या युवकाने आत्महत्या केली होती. त्याच्या कुटुंबातील सदस्यांना समाजाच्या वतीने ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत देऊन आधार देण्यात आला.
राज्यात काही दिवसांपासून मराठा आरक्षण,धनगर आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत.आरक्षणावरून वातावरण तापले आहे.मराठा व धनगर दोन्ही समाज आता आरक्षणासाठी रस्त्यावर उतरू लागले आहेत.दोन्ही समाजातील तरूण आत्महत्या करत आहेत.त्यांच्या कुटुंबियांचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे.धनगर आरक्षणासाठी २५ ऑक्टोबर २०२३ रोजी तालुक्यातील चिंचखेड येथील नर्सिंग गायकवाड या ३१ वर्षिय तरुणाने आत्महत्या केली होती.त्याच्या पश्चात पत्नी रेणुका गायकवाड वय २७ वर्षे,दोन मुली,एक मुलगा आहे.शासन दरबारी या कुटुंबाला मदत व्हावी यासाठी पाठपुरावा झाला मात्र शासनाकडून कोणतीच मदत करण्यात आली नाही. अखेर २१ नोव्हेंबर ला झालेल्या जालना जिल्हा महामोर्चा साठी समाजाकडून निधी जमा झाला होता त्या पैकी उरलेली ५१हजार रुपये ही रक्कम नरसिंग गायकवाड यांच्या परिवाराला मदत म्हणून देण्यात आली.यावेळी धनगर समाजाचे युवा नेते दिपक बोऱ्हाडे,पांडुरंग कोल्हे, नितीन कानडे,भगवान माथीले,कपिल दहेकर,धनराज देशमुख,भगवान कावळे,अक्षय आटोळे,ज्ञानेश्वर भुसारे यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
Add Comment