जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा जळगांव जामोद येथे होणार आहे.त्या अनुषंगाने स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच संपन्न झाली.
शिवसेना(ठाकरे गट) चे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दि.२२ रोजी स्थानिक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालयाच्या मैदानात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेच्या अनुषंगाने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) चे नेते प्रसेनजित पाटील,काँग्रेस पार्टी च्या पक्षनेत्या डॉ.स्वाती वाकेकर, शिवसेना(उबाठा) चे जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्तात्रय पाटील,तालुकाप्रमुख गजानन वाघ,मुश्ताक भाईजान, प्रमोद सपकाळ,भीमराव पाटील,मीना सातव,समाधान दामधर,तुकाराम काळपांडे,रमेश ताडे,उल्हास माहोदे,ऍड.करीम खान,इरफान खान,आशिष वायझोडे, ऍड.मोहसीन खान यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Add Comment