खासदार प्रतापराव जाधव,डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या प्रयत्नाला यश.
देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :
देऊळगाव राजा व सिंदखेडराजा या दोन्ही तालुक्यातील गावांना जोडण्यासाठी आमना नदी आडवी आहे आणि या नदीवर दळणवळणासाठी पूल पूल उभारण्यात यावा अशी मागणी स्वातंत्रत्रोत्तर काळापासून सुरू आहे. जून ते डिसेंबर महिन्यापर्यंत ही नदी वाहत असते. देऊळगाव राजा तालुक्यातील पिंपळगाव येथे सिंदखेड राजा तालुक्यातील मुले शिक्षणासाठी ये जा करीत असतात.या नदीपात्रातून भरपूर पाणी असल्यामुळे दररोज जीवघेणा प्रवास विद्यार्थ्यांना व नागरिकांना करावा लागतो.त्यामुळे शासन दरबारी अनेक वेळा प्रश्न उपस्थित करूनही आजपर्यंत मार्गी लागला नाही.देऊळगाव राजा तालुक्यातील निमगाव गुरू व नारायण खेड येथेही अशीच परिस्थिती आहे.त्यामुळे हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा अशी आग्रही मागणी खा.प्रतापराव जाधव व माजी आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.अखेर सदर पुलासाठी ९ कोटी १५ लक्ष रुपये निधी मंजूर झाला असून प्रतीक्षेत असलेल्या जळगाव पिंपळगाव येथील पुलाचं काम मार्गी लागले आहे.
यासंदर्भात १४ नोव्हेंबर रोजी डॉ.शशिकांत खेडेकर यांनी नागपूर येथे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची त्याच्या निवासस्थानी भेट घेऊन प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी केली होती.पुलाअभावी विद्यार्थी व नागरिक वाहून गेल्याच्या घटना झालेल्या आहेत.नदीच्या दोन्ही बाजूंनी गावातील शेती असल्यामुळे शेतकरी मजूर महिला व पुरुष यांना नदीतूनच जावे लागते.अचानक नदीला पूर आल्यामुळे जनावरे वाहून गेल्याची घटना खूप वेळा घडलेल्या आहेत.या पुलासाठी तात्काळ निधी मंजूर करण्याची मागणी डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती.सदर मागणी मंजूर केल्याबद्दल ना.नितीन गडकरींचे गावकऱ्यांनी आभार मानले आहेत.
★भाजपच्याअनेक मान्यवरांनी या गावाला दिली आहे भेट!★
भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेपासून एकनिष्ठ व भारतीय जनता पक्षावर या परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात प्रेम करणारी आहेत.या ठिकाणी तीन वेळा उपमुख्यमंत्री स्व.गोपीनाथ मुंडे,दोन वेळा केंद्रीय मंत्री स्व.प्रमोद महाजन व एक वेळा सरसंघचालक मोहन भागवत यांनी या गावात भेट दिली असल्याची आठवण डॉक्टर शशिकांत खेडेकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करून दिली होती.
Add Comment