जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
महाराष्ट्र राज्य पणन महासंघ मुंबई निवडणूक ७ जानेवारी ला पार पडली.त्यानंतर झालेल्या मतमोजणीत ओबीसी मतदारसंघातून प्रसेनजीत पाटिल यांनी भाजपाचे मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय चंद्रकांत बाविस्कार यांचा पराभव केला.या निवडणूकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ८, राष्ट्रीवादी(शरद पवार)गट ४, राष्ट्रवादी (अजित पवार)गट ४ व भाजपा १ याप्रमाणे संचालक मंडळ तयार झाले आहे.
१२ फेब्रुवारी रोजी अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड झाली यामध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे सर्वांत जास्त ८ संचालक असल्याने त्यांना अध्यक्ष पद तर राष्ट्रवादी (शरद पवार)गटाला उपाध्यक्ष पद देण्यात आले आहे. त्यानुसार काँग्रेस आमदार तथा संचालक कुणाल पाटिल हे अध्यक्ष तर राष्ट्रवादीचे नेते प्रसेनजीत पाटिल यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली आहे.या निवडी नंतर जळगाव जामोद येथे फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना(उ.बा.ठा) सहसंपर्क प्रमुख दत्ता पाटिल,शिवसेना तालुकाध्यक्ष गजानन वाघ,राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्ह्याध्यक्ष एम.डी.साबीर,राष्ट्रवादी जिल्हा प्रवक्ते करीम खान,जिल्हा सरचिटनीस मोहसीन खान यांच्यासह महाविकास आघाडी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.
Add Comment