शालेय जीवन म्हणजे भावी व यशस्वी आयुष्यासाठीची पायवाट….अनिल जयस्वाल
जळगांव जामोद| समर्थ भारत मराठी :

जनता विद्यालय, जामोद येथे इयता दहावीचा मार्च २०२३ मध्ये जे विद्यार्थी गुणवंत ठरलेत त्यांच्या सत्कार व गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल हे होते तर प्रमुख उपस्थिती मध्ये जामोद येथील व्यावसायिक पुरुषोत्तम राठी,जळगांव शिक्षण मंडळाचे सचिव अनुप पुराणिक,संचालिका गायत्री विप्रदास, मुख्याध्यापक राजपूत व पर्यवेक्षक तथा संचालक, अभिजित कुलकर्णी हे होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल व कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित म्हणून लाभलेले अनुप पुराणिक,गायत्री विप्रदास यांनी विद्यार्थी जीवनाला किती महत्व आहे? हे अनेक संदर्भ देऊन विषद केले.सदर संपन्न झालेल्या सोहळ्यात २०हजार रुपयांच्या वर असलेल्या बक्षीसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजपूत यांनी केले तर बहारदार संचालन दुधे मॅडम यांनी केले.यावेळी साहिल धुर्डे,साक्षी राऊत,संगीता बोडखे यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन गौतम गवई यांनी केले.कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी पालकांची उपस्थिती सुद्धा लक्षणीय होती.













