टाकरखेड भगिले येथे आ.शिंगणेचे घरोघरी औक्षण करून स्वागत!
देऊळगाव मही | समर्थ भारत मराठी :
देशाच्या विकासाचे मूळ हे ग्रामपंचायत आहे. ग्रामपंचायतला जर सक्षम सरपंच लाभला तर गावाचा कायापालट होतो.खऱ्या अर्थाने जर गावाला उंच शिखरावर नेऊन ठेवायचं असेल तर प्रत्येक बाबतीत राजकारण सुरू न ठेवता विकासाचा दूरदृष्टीकोन ठेवून जर सहकार्य केलं तर काय होऊ शकतं हे सरपंच पदाची धुरा सांभाळल्यानंतर अवघ्या काही दिवसात रवी भागिले व नितेश देशमुख यांनी दाखवून दिले असून गावच्या विकासाची खुणगाट यांनी बांधली.मागील पाच वर्षापासून थांबलेला विकासरथ येथे जोमाने सुरू होईल.येणाऱ्या काळात भूलथापांना बळी न पडता गावकऱ्यांनी विकास कामे करणाऱ्यांच्या मागे राहावे असे आवाहन आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी देऊळगाव राजा तालुक्यातील टाकरखेड भागिले येथेआयोजित कार्यक्रमाप्रसंगी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ.रामप्रसाद शेळके,जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष गंगाधर जाधव,देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंगणे,राष्ट्रवादी विधानसभाध्यक्ष गजानन पवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष गजानन चेके,राजू चित्ते,विलास शेळके यांची उपस्थित होती.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच रवींद्र भागिले,उपसरपंच नितेश देशमुख,गणेश देशमुख,देविदास पटवकार,ज्ञानेश्वर भागिले,लीलाबाई भागिले, प्रल्हाद भानुसे यांनी परिश्रम घेतले.
★निघाली भव्य मिरवणूक व घरोघरी झाले औक्षण.★
मातृतीर्थ सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातील लोकनेता म्हणून आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांची ओळख आहे. टाकरखेड भागिले येथे त्यांचे आगमन होताच गावकऱ्यांनी भव्य मिरवणूक काढली,फटाक्यांची आतिषबाजी करत एक दिवाळी साजरी केली तर महिलांनी घरोघरी त्यांचं औक्षण केलं त्यामुळे यावेळी गावकऱ्यांचे प्रेम पाहून आ.डॉ. शिंगणे भारावून गेले होते.
Add Comment