political party बुलढाणा जिल्हा लोणार

लोणार शहरात संविधान पालखीचे जंगी स्वागत.

Spread the love

◆ठिकठिकाणी यात्रेवर पुष्पवृष्टीसह संविधान शाखांचे पुर्नगठन फलकांचे अनावरण.◆

◆लोणार शहर काँग्रेस कमिटी व नगरपरिषदेच्या वतीने संविधान जागर यात्रेचे भव्य स्वागत.◆

◆लोणार नगरपालिकेचे साहेबराव पाटोळे यांनी आपल्या खांद्यावर घेऊन रायपूर शहरात संविधानाची पालखी मिरवली.◆

लोणार | समर्थ भारत मराठी :

बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ.राहुल बोंद्रे यांनी संविधान जागर यात्रेची सुरुवात केली या संविधान यात्रेच्या सहाव्या दिवशी लोणार शहर काँग्रेस कमिटी व लोणार नगर परिषदेच्या वतीने तालुक्यातील रायपूर येथे सविधान जागर पालखीचे स्वागत करण्यात आले.

शेतमालाचे पडलेले भाव,वाढती महागाई,बेरोजगारी यातुन वारंवार लोकशाहीवर होणा-या प्रहारांमुळे अभिव्यक्ती स्वांतत्र्य हिरावुन गेले.लोकशाही गिळकृत करून केंद्रातील भाजपाचे मोदी सरकार देशात उद्योगपतींचे राज्य आणू पाहत आहे.मोदी सरकारच्या या देश हिताच्या विरोधी कारवायांमुळे लोकशाही संपृष्टात येत असुन संविधानच नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे प्रतिपादन बुलडाणा जिल्हा

कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केले.संविधान जागर यात्रेत तरूणाई व गावक-यांनी संविधानाप्रती आपली निष्ठा दाखवित प्रचंड प्रतिसाद दिला.

पुढे बोलतांना बोन्द्रे म्हणाले की,बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला वाचविण्याचे कार्य आपल्या सर्वांच्या माध्यमातून करायचे आहे.या संविधानाचे एक उदाहरण म्हणजे लोणार नगरपरिषदेवर आज बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे मातंग समाजाचे नगराध्यक्ष म्हणून पुनम पाटोळे हे निवडून आलेले आहेत. संविधान नसते तर कदाचित हे झाले नसते.

यावेळी लोणार चे ज्येष्ठ काँग्रेस नेते शांतीलाल गुगलीया,  नगरपालिकेचे नगराध्यक्ष साहेबराव पाटोळे,माजी पंचायत समिती सभापती ज्ञानेश्वर चिभडे,लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा मा.उपनगराध्यक्ष शेख समद शेख अहमद,ओबीसी सेल शहराध्यक्ष अंबादास इंगळे,युवक काँग्रेस शहराध्यक्ष विकास मोरे उपस्थित होते.

रायपूर येथे संविधान पालीखीवर पुष्पवृष्टी करीत, सनई चौघडे,तुतारी अनं ढोलताषांच्या निनादात संविधान यात्रेचे स्वागत करण्यात आले.यावेळी चिखली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष समाधान सुपेकर,शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अथोरोदीन काजी,कुणाल बोंद्रे,डॉ.इसराल भाई, चांद भाई मुजावर,आश्विन जाधव,मीडिया सेलचे जिल्हाध्यक्ष श्लोक डांगे पाटील,एजाज मंत्री प्रमुख्याने उपस्थित होते.यावेळी कॉग्रेसच्या विविध फ्रंटलचे व युवक कॉंग्रेस नामफलकांचे अनावरण राहुल बोंद्रेच्या हस्ते करण्यात आले.संविधान यात्रेत कॉग्रेसच्या विविध शाखा,सेल,विभाग,फ्रंटलचे पदाधिकारी कार्यकर्त्यांची मोठ्या संखेने उपस्थिती होती.

error: Content is protected !!