Front Sports देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

मातृतिर्थाच्या ज्योतिरादित्य शेळकेने क्रिकेट मध्ये गाजवले संभाजीनगरचे मैदान.

Spread the love

देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी:

(सुनील मतकर)

बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. रामप्रसाद शेळके यांचे चिरंजीव ज्योतिरादित्य शेळके यांनी क्रिकेट स्पर्धेत खुल्या वयोगटात जालना संघाकडून अप्रतिम फलंदाजी करत १०२ चेंडूमध्ये १५ चौकार व एक षटकारसह ९३ धावाची तुफान फलंदाजी करत संभाजीनगरच मैदान गाजवलं.

अवघे  पंधरा वर्षे वय असताना ज्योतिरादित्य  शेळके यांची शरीरयष्टी सुदृढ व कमाल उंची असल्यामुळे क्रिकेट क्षेत्रातील बोनटेस्ट प्रक्रियेनुसार त्यांना सोळा वर्षे खालील वयोगटांमध्ये खेळता आले नाही. त्यामुळे खचून न जाता याच कमजोरीला ताकद बनवत त्यांनी खुल्यागटामध्ये (ओपन कॅटेगिरी) खेळण्याचा साहस दर्शवले.ज्योतिरादित्य यांनी केलेले हे धाडस म्हणजे १३० प्रति तास वेगाने येणारा चेंडू पंधरा वर्षाच्या मुलांनी खेळायचा.अर्थातच क्रिकेट विश्वातील देव ज्यांना संबोधले जाते असे सचिन तेंडुलकर यांच्या १४ वर्षाच्या क्रिकेट पदार्पण प्रसंगाची जाणीव करून देते.जालना विरुद्ध पुणे विभाग या सामन्यामध्ये आपल्या संघाकडून ओपनिंग करत संघाच्या विश्वास सार्थ ठरला आहे.यावेळी चौफेर फटकेबाजी करत १५ चौकारासह एक उत्तुंग षटकार लॉंगऑन च्या दिशेने आकर्षक ठरला होता. दुर्दैवाने या सामन्यामध्ये केवळ सात धावा दूर असताना ज्योतिरादित्य यांना आपल्या प्रथम शतकापासून वंचित राहावे लागले.

जालना संघाकडून खेळतांना ज्योतिरादित्य यांनी मागील दोन सामन्यात ७७ चेंडू मध्ये ३२ धावा तर ६० चेंडू मध्ये ३२ अशी कामगिरी नोंदवली होती.पुणे विभागाविरुद्ध च्या सामन्यांमध्ये ज्योतिरादित्य यांची चौफेर फटकेबाजी पहात विरोधी संघ,प्रेक्षक आवाक राहिले.पंधरा वर्षाचा मुलगा खुल्या प्रवर्गामध्ये म्हणजेच वीस ते तीस वर्ष वयोगटातील खेळाडूंमध्ये ताशी १३० पेक्षा जास्त वेगाने येत असलेल्या चेंडूचा सामना करत असतांना खेळातील अविस्मरणीय क्षण आहेत.क्रिकेट खेळामध्ये सलामी फलंदाजांवर प्रचंड दबाव असतो.सर्वप्रथम फलंदाजाला मैदानावरील खेळपट्टी,गोलंदाज यांचा कुठलाही अंदाज नसतांना संघाकडून होत असलेली कामगिरी चोख बजावतांना धावफलकावर धावसंख्या वाढती ठेवावी लागते. त्याचप्रमाणे पहिल्या काही शतकामध्ये बाद न होण्याचा सुद्धा मानसिक दबाव  असतो.

 हे सगळं पंधरा वर्षाच्या नवयुवकाकडून सहज सांभाळून ९३ धावांची खेळी केली.आपल्या अविस्मरणीय खेळांमधून ज्योतिरादित्य शेळके यांनी जालना संघात केलेली कामगिरीही निश्चितच अविस्मरणीय राहणार आहे. पुणे विभागापुढे खेळत असताना आपले मनोबल स्थिर ठेवून खेळामधून खेळाडू असल्याचा परिचय देत पुढील सामन्यात सुद्धा शतकेपार खेळी खेळण्याचे धाडस हा मातृ तीर्थातील उगवता तारा ज्योतिरादित्य शेळके निश्चित करेन ही अभिमानाची बाब आहे.

error: Content is protected !!