देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :
कृषी विभागात तालुका कृषी अधिकारी म्हणून काम करताना वसंत राठोड यांनी शेती आणि मातीशी घट्ट नाते जपले.भरघोस उत्पादन आणि उत्पन्न घेता यावे,याकरिता त्यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले.आधुनिक शेती करणाऱ्यासह ज्या,ज्या ठिकाणी नोकरी केली तेथील शेतकऱ्यांना कृषीज्ञान अवगत करून देण्याकरिता त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला.कृषी क्षेत्रातील त्यांची कामगिरी उल्लेखनीय असून शेतकरी आणि कृषी विभागातील कर्मचाऱ्यांसाठी त्यांचे कार्य सतत प्रेरणादायी राहील असे प्रतिपादन उपविभागीय कृषी अधिकारी अंबादास मिसाळ यांनी केले.
कृषी क्षेत्रात शासकीय नोकरीच्या माध्यमातून पाऊल टाकून समृद्धी शेती कशी करावी याचा मूलमंत्र वसंत राठोड यांनी दिला.तालुका कृषी अधिकारी म्हणून त्यांची कारकीर्द वाखाणण्याजोगी राहिली.नुकतेच वसंत राठोड सेवानिवृत्त झाले.त्यांच्या निवृत्तीची माहिती समजल्यानंतर असंख्य शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली.त्यांना पुढील आयुष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या.वसंत राठोड हे शेती आणि मातीशी नाते जपत प्रशासकीय सेवा करणारा माणूस असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या.तसेच कृषी विभागाच्या वतीनेदेखील राठोड यांना यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला.
अधिकारी येतात आणि जातात. परंतु ते कायम कुणाच्या स्मरणात राहात नाहीत. एखादा अधिकारी आपल्या कार्यशैलीने कर्मचाऱ्यांमध्ये स्थान निर्माण करतो आणि सामान्यांचे प्रश्न स्वत:चे समजून पोटतिडकीने सोडवतो. अशा अधिकाऱ्याला निरोप देताना त्यांच्या अधिनस्त अधिकारी आणि कर्मचारी भावविभोर होतात, ती त्यांच्या यशाची आणि लोकप्रियतेची पावती ठरते. हेच तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांच्या बाबतीत घडल्याचे चित्र निरोप देताना पाहायला मिळाले.सतत शेतकरीभिमुख, केवळ शेतकऱ्यांसाठी सेवा देऊन सेवानिवृत्त झालेल्या राठोड यांना अनेक शेतकऱ्यांनी निरोप दिला.
“वसंत राठोड यांनी तालुक्यामधील तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत सर्व योजना पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले. मनरेगा, फळबाग लागवड, महाडीबीटीअंतर्गत यांत्रिकीकरण, सुक्ष्म सिंचन योजना, विविध विस्तार योजना, शेतकरी शेतीशाळा, विविध पिकांचे प्रकल्प या योजनांचे चांगल्याप्रकारे नियोजन करून अंमलबजावणी केली.कृषी विभागाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांनी अनेकांना मार्गदर्शन करून सहकार्य करण्याची भूमिका पार पाडली आहे. कृषी विभागातील त्यांचे कार्य हे उल्लेखनीय आहे.”(अंबादास मिसाळ,उपविभागीय कृषी अधिकारी
आमना नदीच्या खोलीकरणासाठी उल्लेखनीय कार्य :
देऊळगाव राजा शहरातील जलवाहिनी म्हणून ओळखले जाणारी आमना नदीला मृत अवस्था निर्माण झाली होती तत्कालीन आमदार डॉक्टर शशिकांत खेडेकर, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसळे, नगराध्यक्ष मालती कायंदे, यांच्या सोबत महत्वपूर्ण भूमिका तालुका कृषी अधिकारी म्हणून वसंत राठोड यांनी पार पाडली, राज्यात सर्वाधिक शेडनेट, व शेततळे देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यात वसंत राठोड यांच्या पुढाकाराने पूर्ण झाली, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट झाली, शिवाय सिंचनाची सोय झाल्यामुळे अनेक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध झाले.
Add Comment