Agriculture News जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

उटी येथे गुरांचे लसीकरण शिबीर संपन्न.

Spread the love

जळगाव जामोद,दि.१४ | समर्थ भारत मराठी प्रतिनिधी :

पशु चिकित्सालय, कृषी विज्ञान केंद्र आणि स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यान कृषी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने उटी येथे गुरांचे लसीकरण, व्यंधत्व निवारण व जंत निर्मूलन शिबिर नुकतेच पार पडले.

या शिबिरात शेतकऱ्यांना गुरांच्या घटसर्प आणि एकम एकटांग्या आजारांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. गावातील पशुंवर जंत निर्मूलन, गर्भ तपासणी, वंधत्व निवारण तपासणी व घटसर्प लसीकरण करण्यात आले. पशुआरोग्य विमा योजनेबाबतही ग्रामस्थांना माहिती देण्यात आली.

शिबिरासाठी सहायक आयुक्त डॉ. श्वेता मोरखडे(तालुका पशू चिकित्सक अधिकारी)यांनी मार्गदर्शन केले तथा सहायक म्हणून शिरसाट व गावंडे यांनी पशुसेवक म्हणून योगदान दिले. शिबीराच्या यशस्वितेसाठी प्राचार्य प्रा.योगेश गवई, प्रा.नम्रता खिरोडकार, प्रा.अविनाश आटोळे आणि प्रा. प्रमोद डव्हळे यांनी मार्गदर्शन केले. शिबिरात पोलीस पाटील भाऊराव उमाळे, ग्रामस्थ देविदास उमाळे, पंजाबराव उमाळे, संतोष उमाळे उपस्थित होते. तथा कृषी महाविद्यालयाच्या विधी इंगळे, नेहा ढोले, प्रणाली कोकाटे, प्राची पळसपगार, साक्षी गणेशपुरे, रुचिका रामरोहिया, प्रेरणा अमृतकर,कांचन कवळे,वैष्णवी राऊत या विद्यार्थिनींनी शिबीर यशस्वीपणे राबविले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!