जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान जळगाव जामोद शहरातील काही भागात जमावबंदी आदेश लागू.

Spread the love

जळगाव जामोद,दि.४(समर्थ भारत मराठी प्रतिनिधी):

सन २०२४ मध्ये गणपती विसर्जन मिरवणुक दरम्यान झालेल्या दंगलीमुळे गणेशोत्सव २०२५ मधील गणपती मिरवणुकीच्या वेळी सुध्दा सदर ठिकाणी लोकांची गर्दी होवुन पुन्हा तशी घटना घडू नये म्हणून शहरातील काही भागात जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत.

गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान एखाद्या समाजकंटका कडुन मिरवणुकीवर दगडफेक होवुन जातीय दंगल घडुन येण्याची शक्यता नाकारता येत नाही.म्हणून गणेश विसर्जन मिरवणुक मार्ग संत रुपलाल नगर ते वायलीवेस तसेच ताटीपुरा कडे जाणारा रस्ता व चौभारा गल्ली, तलावपुरा येथील खालीकबापु देशमुख यांचे घर ते प्रगटेश्वर शाळा, न्हावीपुराकडे जाणारा रस्ता मंजुर यांचे घराकडे जाणारा रस्ता या भागातील (मिरवणुक मार्ग वगळून) दोन पेक्षा जास्त लोकांनी एकत्रितरित्या फिरु नये असा आदेश मिरवणुक संपेपर्यंत लागु करण्यात आला आहे.

शहरामध्ये गणपती उत्सवा निमीत्य भव्य मिरवणुका काढण्यात येणार असुन मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात मंडळे,नागरिक भाग घेणार आहेत त्यामुळे सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.आदेश कर्तव्यावर असलेल्या सर्व अधिकारी कर्मचारी यांना लागु होणार नसल्याचे पोलीस प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

error: Content is protected !!