जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगांव जा नगरपरिषदच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा.

Spread the love

मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला सामुहिक योग सोहळा.

जळगांव जामोद,दि.२२| समर्थ भारत मराठी प्रतिनिधी :

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त २१ जून रोजी नगर परिषद कार्यालयामार्फत सांस्कृतिक भवन येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

योगा फोर वन अर्थ वन हेल्थ, एक पृथ्वी एक आरोग्यासाठी योग या थीम नुसार सदर कार्यक्रमाला डॉ. अपर्णा कुटे, तहसीलदार पवन पाटील, मुख्याधिकारी डॉ. सुरज जाधव, प्रकल्प अधिकारी अनिल इंगळे, शिक्षण लिपिक गजानन मोरे,राजेश गावंडे कार्यालय अधीक्षक, निखिल भोसले, रवींद्र चौधरी,वैभव गावंडे,कैलास पाटील,निलेश शर्मा, परीक्षित ठाकरे यांच्यासह मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक योग गुरु पुष्पा कसूरकार मॅडम व प्रजापती ब्रह्मकुमारी शशी दीदी यांनी उपस्थिताना मोलाचे मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या  स्वागताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.त्यानंतर उपस्थितांना व्यसनमुक्ती व स्वच्छतेची शपथ देण्यात आली.यावेळी योग गुरु  पुष्पा कसूरकार व अनुराधा बारहाते यांनी आसने व प्राणायामाचे प्रात्यक्षिके उपस्थितांकडून करून घेतली.प्रजापिता ब्रह्मकुमारी शशी दीदी यांनी ध्यान व साधनेचे बाबत मार्गदर्शन केले.त्यानंतर महिला योगा ग्रुपने सर्वांना विविध औषधीयुक्त आरोग्यदायी रस वाटप केला.

कार्यक्रमात शहरातील व्यापारी संघटना मॉर्निंग क्रिकेट क्लब कौस्तुभ नगर,महिला योगा ग्रुप,डॉक्टर असोसिएशन ,आर्ट ऑफ लिविंग,प्रजापिता ब्रह्मकुमारी,राजकीय पक्षाचे पदाधिकारी न. प. सर्व शिक्षक,कर्मचारी,उपविभागीय कार्यालय,तहसील कार्यालय,पंचायत समिती कार्यालय, नगरपरिषद कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी ,महिला बचत गट सीआरपी, शाळेचे विद्यार्थी, पत्रकार,प्रतिष्ठित नागरिकांनी  उत्साहाने सहभाग दर्शविला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल इंगळे यांनी केले तर आभार प्रदर्शन मुख्याधिकारी डॉ.सुरज जाधव यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरपरिषद सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!