political party बुलढाणा जिल्हा लोणार

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी सदानंद पाटील तेजनकर.

Spread the love

लोणार | समर्थ भारत मराठी :

लोणार तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक तसेच शेतकरी शेतमजुरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे,त्यांच्या न्यायहकासाठी सदैव लढून त्यांना न्याय मिळवून देणारे गोरगरीब जनतेच्या मदतीला धावून जाणारे राष्ट्रवादी पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष सदानंद पाटील तेजनकर यांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.माजी आ.रेखाताई खेडेकर यांच्या हस्ते नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आहे.

“सदानंद पाटील तेजनकर यांनी राष्ट्रवादी पक्ष वाढीसाठी नेहमी प्रयत्न केले.त्यांनी नेहमी गोरगरीब शेतकरी, शेतमजूरांच्या न्यायहकासाठी लढा दिला. त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.” (रेखाताई खेडेकर)

“पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर विश्वास दाखवून जी माझी निवड केली त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ न देता पक्ष वाढीसाठी नेहमी प्रयत्नशील राहील.”(सदानंद पाटील तेजनकर)

नियुक्ती पत्र देतांना समाधान पोफळे,निलेश चव्हाण,बंडू पडघान,नंदकिशोर भांदुर्गे,हबीब भाई उपस्थित होते.

error: Content is protected !!