देऊळगाव मही | समर्थ भारत मराठी :
वाढदिवस म्हटलं की मोठा केक,बॅनर,पार्टी असे वातावरण असते.अंढेरा येथील सामाजिक कार्याने मातृ तीर्थ बुलढाणा जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण करून गेल्या दहा वर्षापासून स्वतःचा वाढदिवस गरीब अनाथ फासेपारधी मुलांना शालेय साहित्य देऊन साजरा करणारे श्री औंढेश्वर प्रतिष्ठान चे विश्वस्त रामेश्वर वाघ यांनी अंढेरा येथील पारधी वस्ती शाळेतील तीस विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देऊन तसेच गावातील प्राथमिक शाळेतील गरजू पंधरा विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप केले तसेच पारधी वस्ती मधील एक अनाथ मुलाला दत्तक घेत वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला ड्रेस घेऊन दिला व गावातील एका विद्यार्थ्याचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले.
“वाढदिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करत समाजाप्रती एक आदर्श उभा करून शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रम कौतुकास्पद आहे.” (ठाणेदार विकास पाटील)
कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील,प्रा.दिलीप सानप,पत्रकार राम पराड,शिवसेना नेते सुभाष डोईफोडे,सेवानिवृत्त अभियंता जगन सानप,गजानन सानप,भारत तेजनकर,गणेश नागरे, वासुदेव जायभाये,गणेश वाघ,सुनील पवार,शिवा मांटे, नागरे सर,पत्रकार ज्ञानेश्वर मस्के,पत्रकार राधेश्याम ढाकणे यांच्यासह मुख्याध्यापक व शिक्षक वृंद कार्यक्रमास हजर होते. सूत्रसंचालन वाघ सर यांनी केले.
Add Comment