Education देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

तरुणांचे स्वप्न साकार होण्यासाठी रोजगार मेळाव्याचा लाभ घ्या : समाधान शिंगणे 

Spread the love

देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :

राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी राज्य सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे.तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुढाकार घेत आहे.आपल्या परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना काम मिळावे मतदार संघाचे आ.डॉ.राजेंद्र शिंगणे  यांच्या माध्यमातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन दि.४ रोजी करण्यात आले आहे. तरी या महा रोजगार मेळाव्यात  सहभागी होण्याचे आवाहन देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान भिकाजी शिंगणे  यांनी केले आहे.

आयटीआय,इंजिनिअरिंग,अकाऊंटस,दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार  आहे.यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग,फायनान्स,रिटेल सेल,बँकिंग, इन्शुरन्स कंपनी,फार्मा,सुपरवायझर अशी अनेक पदे भरण्यात येणार आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी संपर्क करून नोंदणी करून मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!