घोड्यावर मिरवणुक काढत ग्रामस्थांनी केले रविकांत तुपकरांचे स्वागत.
जळगाव जामोद | समर्थ भारत मराठी :
तालुक्यातील सातळी येथे रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शेतकरी-कष्टकरी-मजुर व तरुणांचा भव्य असा ‘एल्गार परिवर्तन मेळावा’ संपन्न झाला.
मेळाव्याआधी ग्रामस्थांनी घोड्यावर बसून संपूर्ण सातळी गावातुन रविकांत तुपकरांची जंगी मिरवणूक काढली तर माय-माऊल्यांनी औक्षण करून आशीर्वाद दिले.या मेळाव्याला परीसरातील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
“लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काही नेत्यांनी मला वर्षभर तुरुंगात डांबण्याचा घाट घातला आहे. पण ज्या पद्धतीने गावगाडयातील शेतकरी माझ्यावर प्रेमाचा वर्षाव करीत आहेत,त्या प्रेमाखातीर एक काय दहा वर्ष तुरुंगात जाईल पण न्याय्यहक्काची लढाई सोडणार नाही” (रविकांत तुपकर)
यावेळी जेष्ठ शेतकरी नेते गजानन अमदाबादकर,श्याम अवथळे,अमोल राऊत,सचिन शिंगोटे,निलेश खूपसे,दिपक पाटील-अढाव,अस्लम शेख,शिरू पाटील,वैभव जाणे, अश्फाक देशमुख,अजय गिरी,सदाशिव जाणे,प्रणव देशमुख,आकाश अटोळे यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.













