political party देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

रोजगार मेळाव्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली जनजागृती. 

Spread the love

देऊळगाव राजा | समर्थ भारत मराठी :

राज्यातील बेरोजगारी कमी करण्यासाठी व तरुणांच्या हाताला काम मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने पुढाकार घेत आहेत.आपल्या परिसरातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना काम मिळावे यासाठी मतदार संघाचे आमदार डॉ.राजेंद्र शिंगणे यांच्या माध्यमातून महारोजगार मेळाव्याचे आयोजन दि.४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. या महारोजगार मेळाव्याची इच्छुक उमेदवारांना माहिती व्हावी यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष गजानन चेके जनजागृती करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते  राजू चित्ते, गजानन पवार, यांच्यासह अन्य पदाधिकारीही मेळाव्याच्या जनजागृतीसाठी परिश्रम घेत आहेत.

 या रोजगार मेळाव्यात आयटीआय, इंजिनिअरिंग, अकाऊंटस,दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग, फायनान्स,रिटेल सेल,बँकिंग, इन्शुरन्स कंपनी, फार्मा, सुपरवायझर अशी अनेक पदे भरण्यात येणार आहे. भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी,संपर्क करून नोंदणी करून मेळाव्यात उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!