जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजन.

Spread the love

जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :

अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या ७५ वर्षापासून देशभरात विविध राष्ट्रीय उपक्रम राबवीत आहे.अविरतपणे राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी होऊन देशहितासाठी आपले महत्त्वपूर्ण योगदान देण्यात विद्यार्थी परिषदेचा मोलाचा वाटा आहे.अशातच देशाच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देश भक्तीच्या वातावरणामध्ये शहरातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने पाचशे फूट तिरंगा ध्वजाची रॅली काढण्यात आली.

या रॅली मध्ये शहरातील विविध शाळा,विद्यालये आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अथक परिश्रमाने ही तिरंगा यात्रा सफल केली.यामध्ये प्रामुख्याने अग्रिव्हिजन प्रांत सहसंयोजक, जळगाव जामोद नगरमंत्री चंद्रकांत बोबडे, विद्यार्थिनी प्रमुख प्राची बोराखडे,गौरी वानखडे,नेहा बोडके,जिल्हा संयोजक ऋषिकेश वाघमारे,शुभम राजपूत,विशाल इंगळे नगर सहमंत्री,अनिकेत वाघ, वैभव इंगळे, दिपाली इंगळे त्यांच्यासह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी व विद्यार्थी बहुसंख्येने सहभागी झाले होते.

error: Content is protected !!