“एक मराठा, लाख मराठा” च्या घोषणा देऊन पेढे भरवून केला आनंद साजरा.
लोणार | समर्थ भारत मराठी :
मराठा समाजाला टिकणारे आरक्षण मिळावे यासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटी वरून मुंबईत आपल्या लाखो समाज बांधवांसोबत दाखल झाले होते. दि.२६ पासून त्यांनी उपोषनाला सुरूवात केली या उपोषणाची सरकार ने दखल घेऊन उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची वाशी येथील शिवाजी चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली व त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण सोडवले. मराठा समाजाला आरक्षण मिळाले म्हणून लोणार शहरात मराठा बांधवाकडून फटाके फोडून,कपाळी विजयाचा गुलाल लावून तसेच पेढा भरवून उपस्थितांचे तोंड गोड केले.या वेळी शिवाजी शिक्षणसंस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी,डॉ.राजेश मुंदडा,संजय वायाळ, सुधाकर मापारी,अशोक वारे,जनार्धन मापारी,गजानन देशमुख,आदित्य मापारी,ऍड. निशांत वायाळ,दत्ता भगत दीपक सरकटे,गोपाल मापारी,सर्जेराव मोरे,अयुब खान,दता दुधमोगरे,अक्षय सरकटे,शेख बबलू यांच्यासह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
“हा विजय सकल मराठा समाजाचा आणि त्यासाठी जीवाची बाजी लावून झुंजलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा विजय आहे.आपल्या जीवाची पर्वा न करता सकल मराठा बांधावाना आरक्षण मिळून देण्यासाठी ते संघर्ष करीत होते.” …… प्रकाशराव मापारी













