जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :
शहरातील सातपुडा शिक्षण संस्थे च्या शाखांमध्ये व सातपुडा कॅम्पस मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. ध्वजारोहण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी आ. कृष्णराव इंगळे यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. शाळेच्या वतीने प्रमुख मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी बहारदार संगीत व कवायतीची प्रात्यक्षिके केली.महासिद्ध अर्बन बँक मुख्य शाखा जळगांव जामोद येथे सुद्धा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.बँकेत ध्वजारोहण डॉ.स्वाती संदीप वाकेकर अध्यक्ष महसिद्ध अर्बन ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
सातपुडा नर्सिंग व फार्मसी इन्स्टिट्युट शेगांव येथे ध्वजारोहन डॉ. संदिप वाकेकर (बालरोगतज्ञ) ह्यांच्या हस्ते पार पडले. येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजिन करण्यात आले होते.सातपुडा शिक्षण संस्था द्वारा संचालित सातपुडा इंग्लिश स्कूल पहूरजिरा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले व ध्वजारोहण प्रा. ज्ञानेश्वर वानखडे ह्यांच्या हस्ते करण्यात आले.सातपुडा शिक्षण संस्था द्वारा संचालित कला वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल येथे प्रा. श्रीराम येरणकर ह्यांच्या हस्ते ध्वारोहण करण्यात आले.यावेळी विद्यार्थ्यांकडून देशभक्तीपर समूहगीत सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शिशुवर्गाच्या विद्यार्थ्यांनी देखील देशभक्तीपर गीत सादर केले.यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे कृष्णराव इंगळे ह्यांनी देश सेवा कार्य सदा आपल्या हातून घडो ही भावना व्यक्त केली.तसेच डॉ.स्वाती संदीप वाकेकर यांनी सुद्धा सर्व विध्यार्थीना प्रजासत्ताक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेच्या मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी व पालकांची उपस्थिती लाभली .
Add Comment