Education जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जनता विद्यालय, जामोद येथे सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न.

Spread the love

स्नेहसम्मेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांचे दालन ….. अनिल जयस्वाल                

जळगांव जामोद | समर्थ भारत मराठी :

गेल्या तीन दिवसांपासून जनता विद्यालय, जामोद येथे क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल होती. ह्याचाच एक भाग म्हणून एकदिवसीय स्नेहसम्मेलन दि.२५ जानेवारीला जनता विद्यालयात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उदघाटन जळगाव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल जयस्वाल यांनी केले तर अध्यक्षस्थानी सचिव अनुप पुराणिक हे होते. प्रमुख उपस्थिती मध्ये मुख्याध्यापक राजेंद्रसिंह राजपूत व पर्यवेक्षक तथा संचालक अभिजीत कुलकर्णी हे होते. यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक अनिल जयस्वाल व कार्यक्रमाचे अध्यक्ष अनुप पुराणिक यांनी विद्यार्थी दशेत   स्नेहसंमेलनाचे महत्व विशद केले. सकाळच्या सत्रात वर्ग ५ ते ७ चे, दुपारच्या सत्रात वर्ग ८ ते ९ चे, तर संध्याकाळच्या सत्रात जनता प्राथमिक विद्यालयाचे कार्यक्रम पार पडले.स्नेहसम्मेलनात विविध गाण्यावर नृत्य, एकपात्री नाटिका व शिक्षणावर आधारित नाटकांचे सुंदर सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले.कार्यक्रमाचे बहारदार संचालन दांडगे मॅडम व दुधे मॅडम यांनी केले तर स्नेहसम्मेलन यशस्वी पार पाडण्यासाठी सांस्कृतिक विभागाचे घुगे व दुधे मॅडम यांच्या सोबतीने सर्व शिक्षकांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे परीक्षक म्हणून मीनल दामधर, डॉ. शेख मॅडम व पूजा काटोले, अर्चना कुलकर्णी, रक्षा गांधी यांनी काम बघितले. यावेळी पालकांचा सुद्धा प्रेक्षक म्हणून उत्स्फूर्त सहभाग होता.

error: Content is protected !!