Maharashtra बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा

भा.ज.प.च्या स्वागत कक्षाने केले जिजाऊ भक्तांचे स्वागत.

Spread the love

विनोद वाघ यांची अभिनव संकल्पना.

सिंदखेडराजा|समर्थ भारत मराठी :

राजमाता जिजाऊ साहेबांची जयंती १२ जानेवारी ला जिजाऊंच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देशभरातून जिजाऊ भक्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे येत असतात. सर्व जिजाऊ भक्तांचे,मान्यवरांचे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ,ऍड.संदीप मेहत्रे व सहकाऱ्यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.

महाराष्ट्राची अस्मिता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी राज्यातूनच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी राजवाड्यासमोर सकाळपासूनच गर्दी केली होती. ४२६ व्या जयंतीनिमित्त जिजाऊंना वंदन करण्यासाठी जिजाऊ भक्तांनी  मातुतीर्थ सिदखेडराजा नगरीत या वर्षी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. गेल्या दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटांमधील सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्यात आला नव्हता त्यामुळे यावर्षी जिजाऊ भक्तामध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. जिकडे तिकडे “जय जिजाऊ जय शिवराय” चा जयघोष दिसून आला.यावेळी जिजाऊ भक्तांच्या स्वागतासाठी अनेक राजकीय पक्षांनी स्वागत फलक लावले होते. मात्र नेहमीच आगळी वेगळी संकल्पना मांडणारे भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी भारतीय जनता पक्षाचा स्वागत कक्ष उभारून या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक जिजाऊ भक्तांचं स्वागत केले त्यामुळे त्यांच्या या स्वागत कक्षाची जिजाऊ नगरीत जोरदार चर्चा होती.

स्वागत कक्षाला दिल्या मान्यवरांनी भेटी..

भारतीय जनता पक्षाच्या वतीने स्वागत कक्ष उभारण्यात आला होता.कक्षाला माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे, आ.आकाश फुंडकर,आ.श्वेता महाले,भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसुख संचेती,माजी आ.विजयराज शिंदे,भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे,सचिन देशमुख यांनी भेटी दिल्या.

विनोद वाघ यांच्या कार्याचं ना.मुनगंटीवारांनी केलं कौतुक..

राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या जन्मस्थळी नतमस्तक होणाऱ्या जिजाऊ भक्तांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्षाने स्वागत कक्ष उभारून या ठिकाणी येणाऱ्या जिजाऊ भक्तांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करणे हा अत्यंत चांगला उपक्रम असून या उपक्रमाबद्दल भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ व त्यांच्या सहकार्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कौतुक केले.

error: Content is protected !!