उपाध्यक्षपदी सचिन देशमुख तर सचिवपदी अनुप पुराणिक.
जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
शहरातील नामांकित श्री ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव पदाची अविरोध निवड करण्यात आली आहे. यामध्ये अध्यक्षपदी ओमप्रकाश राठी, उपाध्यक्षपदी सचिन देशमुख तर सचिवपदी अनुप पुराणिक यांची निवड करण्यात आली.

संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली.यामध्ये माऊली पॅनेलने घवघवीत यश संपादन करून संचालक मंडळावर आपले वर्चस्व कायम ठेवले.३१ डिसेंबर रोजी पार पडलेल्या निवडणुकी नंतर ११ जानेवारी रोजी पतसंस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष व सचिव पदाची निवड प्रक्रिया पार पडली.पतसंस्थेच्या सभागृहामध्ये पार पडलेल्या या प्रक्रियेमध्ये ओमप्रकाश राठी यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी,उपाध्यक्ष म्हणून सचिन देशमुख,सचिवपदी अनुप पुराणिक यांची निवड करण्यात आली.तज्ञ संचालक म्हणून माजी नगराध्यक्ष रामदास बंबटकार यांची नियुक्ती करण्यात आली.निवड प्रक्रियेत अध्यासी अधिकारी व सह्ययक निबंधक एम. ए. कृपलानी यांनी तर सह्ययक म्हणून दीपक धर्माळ यांनी काम पाहिले.
निवडीनंतर नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे संस्थेच्या व सभासदांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
Add Comment