जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा संग्रामपूर

सातपुडा शिक्षण संस्थेच्या वतीने पत्रकारांचा सन्मान संपन्न.

Spread the love

पत्रकार हा समाजाचा आरसा -डॉ.स्वाती संदीप वाकेकर

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी : 

मराठी पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन पत्रकार दिन म्हणून दि.६ रोजी साजरा करण्यात येतो त्याअनुषंगाने सातपुडा शिक्षण संस्थेच्या सभागृहात जळगांव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान संपन्न झाला.

यावेळी मंचावर माजी आ.कृष्णराव इंगळे,डॉ.स्वाती वाकेकर (सचिव,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस) अर्जुन घोलप (शहराध्यक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस),जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब भोजने,जेष्ठ पत्रकार गुलजार खा पठाण,अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कैलास देशमुख,जेष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी उपस्थित होते.

“मला दोन अपत्ये नसुन तीन अपत्ये आहेत.माझ्या दोन मुली आणि तिसरे अपत्य म्हणजे माझ्या संस्था.माझ्या मुली प्रमाणेच माझ्या संस्थेचे मी पालन पोषण करत असतो.ज्याप्रमाणे माझ्या मुलींना वागवलं,लहानाचे मोठे केलं,त्याचप्रमाणे माझा तेवढाच जीव या संस्थांमध्ये आहे.या संस्थांच्या माध्यमातून आज सहा ते सात हजार मुलं जरी शिकत असली तरी अशी कितीतरी मुलं आज घडुन गेली, मोठ्या पदावर गेली.घरच्या भाकरी वर त्यांच पालनपोषण झालं,शिक्षण झालं व आज नोकरीला लागली आणि या माध्यमातून गावात सुध्दा रोजगार उपलब्ध झालेत.शिक्षण देण्याचे हे जे पुण्य मला लाभलं हेच माझं मी भाग्य समजतो.”

……… माजी आ.कृष्णराव इंगळे

“पत्रकार हा समाजाचा आरसा असतो, समाजातील वाईट प्रवृत्ती यांचं हनन करण्याचे काम हा पत्रकार करत असतो.निषपक्ष पणे पत्रकारीता केली पाहिजे.”

……… डॉ.स्वाती वाकेकर

सातपुडा शिक्षण संस्था व महासिध्द अर्बन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या कार्यक्रमात पत्रकारांचा सन्मान करून सन्मानचिन्ह देण्यात आले.

कार्यक्रमाला जळगांव व संग्रामपुर तालुक्यातील बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजाभाऊ कोकाटे तर आभारप्रदर्शन प्रविण भोपळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ संदीप वाकेकर,राजीव घुटे, श्रीकृष्ण केदार, संदीप मानकर,शे झहीर,अजहर देशमुख, शे  नासीर,शे.जुनेद, हुसेन राही,शे इमरान,ज्ञानेश्वर राजनकर, अयाज भाई, तौफिक भाई,अनिल इंगळे, विशाल सातव,नितीन जाधव यांनी परिश्रम घेतले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!