Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा शेगांव

शेगाव येथे माळी समाज युवक युवती परिचय संमेलन संपन्न.

Spread the love

उपवर युवक युवती परिचय संम्मेलन ही काळाची गरज – माजी आ. कृष्णराव इंगळे

परीचय मेळाव्यातून वेळ व पैशांची  बचत – डॉ.स्वाती संदीप वाकेकर

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

शेगांव येथील सातपुड़ा कॅम्पस मध्ये दि.७ रोजी जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका महात्मा फुले माळी समाज मंडळ यांच्या विद्यमाने उपवर युवक युवती परिचय संमेलन उत्साहात संपन्न झाले.

परिचय संमेलनाचे हे ३५ वे वर्ष होते.यावर्षी बाराशे युवक युवतींनी आपल्या नावाची नोंदणी केली होती व यावर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे या परिचय सम्मेलनाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद सोबतच उत्कृष्ट नियोजन होतं.परिचय असो वा त्यांची भेट गाठ असो हे सर्व सोपस्कार सुरळीत पार पडत होते.संमेलनात युवती चे १६६ परिचय तर युवकाचे १६५ परिचय झाले.

यावेळी मंचावर डॉ.स्वाती वाकेकर, प्रा.हरिभाऊ इंगळे, साहेबराव कलोरे ,भिकाजी महाराज,प्रकाश ढोकणे, प्रा.सदांनद माळी, ललित काळपांडे,उर्मिलाताई इंगळे, मीना सातव, तसेच यावर्षीचे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनिल तायडे, कार्याध्यक्ष सुनिल येनकर, उपाध्यक्ष गणेश भड, उपाध्यक्ष आशिष राजनकर, सचिव सुरेश वानखडे, कोषाध्यक्ष सारंगधर गोमासे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलतांना उपवर युवक युवती परिचय संमेलनाचे प्रणेते तथा सातपुडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी आ.कृष्णराव इंगळे यांनी सांगितले की,उपवर युवक युवती परिचय संम्मेलन हे काळाची गरज आहे आणि आजच्या आधुनिक युगात प्रत्येक उपवर युवक युवती च्या पालकांनी या परिचय संमेलनात सहभाग घेतला पाहिजे व प्राथमिक स्वरूपाची बोलणी या परिचय माध्यमातून करून घ्यावी.

मंडळाचे नियोजन बद्ध व्यवस्थापन कौतुकास्पद असून परिचय संमेलनातून वेळ व पैशाची बचत होते असे डॉ.स्वाती वाकेकर यांनी आपल्या प्रस्ताविकातून सांगितले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रविण भोपळे, सुपडा इंगळे, अलका निमकर्डे  यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नितीन सातव,डॉ.संदीप वाकेकर,राजीव घुटे,यांचेसह मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!