Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ निवडणूकीत प्रसेनजीत पाटिल विजयी.

Spread the love

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

महाराष्ट्र राज्य कापूस पणन महासंघ, मुंबई निवडणूक निवडणुकीत इतर मागासवर्गीय मतदारसंघात जळगांव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रसेनजित पाटील हे निवडून आले आहेत.

आधी १७ संचालक मंडळामध्ये १३ उमेदवार अविरोध निवडून आले होते.खामगाव झोन मधून गेली ३ टर्म संचालक असलेले प्रसेनजीत पाटिल यांनी माजी आमदार धृपतराव सावळे यांच्यासाठी माघार घेऊन त्यांना झोन मधून त्यांना अविरोध दिले.संपूर्ण राज्यातून असलेल्या ईतर मागासवर्गीय (ओबीसी ) मतदारसंघातून निवडणूकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या विरोधात मंत्री गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय तथा जामनेर भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कार व अजित पवार गटाचे उदगीर (लातुर ) येथील भरत चामले हे प्रतिस्पर्धी उमेदवार होते.यामुळे हि निवडणूक अटीतटीची होईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा होती. दि.७  रोजी झालेल्या निवडणूकीत ११ झोन आणि २३ जिल्ह्यातून २०७ मतदारां पैकी १८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दि.९ रोजी झालेल्या मतमोजणीत प्रसेनजीत पाटिल यांना १०९ मते,चंद्रकांत बाविस्कार यांना ७५ मते, भरत चामले यांना ० मते मिळाली. प्रसेनजीत पाटिल यांनी गिरीष महाजन यांचे निकटवर्तीय चंद्रकांत बाविस्कार यांचा ३४ मतांनी पराभव करीत विजय संपदान केला. विजयानंतर त्यांनी जयंत पाटिल,अशोक चव्हाण,विजय  वड्डेटीवार,

अनिल देशमुख,एकनाथराव खडसे,यशोमती ठाकुर,राजेश टोपे, प्रतापराव जाधव, डॉ. राजेंद्र शिंगणे,सुनिल केदार, सुरेश वरपुडकर, कुणालबाबा पाटिल, सुभाष धोटे, अशोक पवार, हर्षवर्धन देशमुख,संतोष कोरपे,सुभाष ठाकरे, रमेश बंग, सुरेश देशमुख, संजय देशमुख, धृपतराव सावळे, प्रफुल मानकर, प्रविण मानकर, अनंतराव देशमुख, शिरीष धोत्रे, वसंतराव घुईखेडकर, माणिकराव शिंदे तथा शेतकरी सहकार आघाडीच्या सर्व संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले. विजयानंतर नागपूर तथा जळगाव जामोद येथे फटाके फोडून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!