Maharashtra बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा

सत्यशोधक चित्रपटाचे कलाकार जिजाऊ चरणी नतमस्तक.

Spread the love

सिंदखेड राजा|समर्थ भारत मराठी :

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले  यांच्या आयुष्यावर आधारित ‘सत्यशोधक’ हा चित्रपट आहे. गेल्या काही दिवसांपासून हा सिनेमा चांगलाच चर्चेत आहे.देशात स्त्रीशिक्षणाची मुहुर्तमेढ रोवणारे, बहुजनांना शिक्षणाची दारे खुले करणारे, सत्यशोधक विचारांचे महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतीबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत ‘सत्यशोधक’ चित्रपटामुळे, अस्पृश्यता निवारण, शिक्षणप्रसार,सामाजिक सुधारणांसाठी फुले दांपत्याने घेतलेले कष्ट,केलेला त्याग,त्यांच्या सत्यशोधक चळवळीचा प्रेरणादायी लढा सर्वांसमोर येणार आला असून या चित्रपटाचे कलाकार १२ जानेवारी रोजी जिजाऊंच्या जन्मस्थळी नतमस्तक झाले.

या चित्रपटामध्ये बाळ ज्योतिबाची भूमिका साकारणारे  प्रथमेश पांडे,बाळ सावित्रीची भूमिका साकारणारे समृद्धी सरवार,निर्माता सुनील शेळके,सहनिर्माता राहुल तायडे,हर्षा तायडे,निता खडसे,किरण डोंगरे,नीता जाधव यांच्यासह अन्य कलाकार जिजाऊ चरणी नतमस्तक झाले.जिजाऊ भक्तांनी व परिसरातील नागरिकांनी त्याचा सत्कार केला.

हा चित्रपटात अंधश्रद्धेच्या अंधकारात खितपत पडलेल्या समाजाला ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेण्याचे काम जोतिरावांनी केले.आपल्या प्रखर लेखणीच्या व स्वकार्य कर्तृत्वाच्या माध्यमातून जन-माणसात नवीन विचार पेरणाऱ्या ज्योतीरावानी शोषण कर्त्यांच्या विरोधात बंड पुकारलं. दुष्ट रूढी परंपराच्या गर्ततेत अडकलेल्या समाजाला मानवतेचा आणि सत्याचा मार्ग दाखवून ज्योतीराव खऱ्या अर्थाने सत्य धर्माचे पथदर्शक ठरले. या अशाच अनिष्ट प्रथांच्या विरोधात सत्याचा शोध घेणारा आणि समानतेच्या वाटेवर चालणाचा ‘सत्यशोधक’  या चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!