Maharashtra crimes जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

बनावट फेरफार प्रकरणी आरोपीसह तलाठी व मंडळ अधिकाऱ्या विरोधात गुन्हा दाखल.

Spread the love

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

तालुक्यातील जामोद येथील नोकरीवर असलेल्या एका इसमाने आपल्याच चुलत्याच्या शेतीचा फेरफार करून शेती हडप केल्याप्रकरणी जळगाव जामोद न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार आरोपीसह तलाठी व मंडल अधिकाऱ्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्राप्त माहितीनुसार जामोद येथील रामकृष्ण सोळंके व त्यांच्या दोन पत्नींच्या मृत्यूनंतर मौजे खेल शिवापूर येथील गट नंबर ८७ शेतीचे खोटे कागदपत्र तयार करून आरोपी उखर्डा सोळंके यांनी न्यायालयातून वारस प्रमाणपत्र मिळविले होते त्याचा वापर त्यांनी मालमत्ता हस्तांतरणासाठी करून  तलाठी आदिती मुळे व मंडळ अधिकारी पंजाब चोपडे यांच्यासोबत हात मिळवनी करत शेतीबाबत फेरफार करून शेती हडप करण्याचा प्रयत्न केला होता.त्यामुळे मृतकाचा चुलत भाऊ श्रीकृष्ण तुळशीराम सोळंके यांने पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे संबंधित आरोपी विरोधात तक्रार केली होती परंतु पोलिसांनी याप्रकरणी कोणतीही कारवाई केली नसल्यामुळे श्रीकृष्ण सोळंके यांनी वकिलामार्फत दिनांक २९ सप्टेंबर २०२१ रोजी जळगाव जामोद न्यायालयात सीआरपीसीचे कलम १५६ (३)नुसार केस दाखल केली होती. न्यायालयाने फिर्यादी श्रीकृष्ण सोळंके यांनी दिलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करून संबंध प्रकरणात निर्णय देत  उखर्डा सोळंके वय ५० रा. जामोद, तलाठी आदिती मुळे व तत्कालीन मंडळ अधिकारी पंजाब चोपडे या तिघांच्या विरोधात जळगाव जामोद पोलीस स्टेशन येथे कलम ४६४,४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७२, ४२०, ३४ भादविनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याने संबंधित आरोपी विरोधात दिनांक ११ जानेवारी २०२४ रोजी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार दिनेश यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक शशिकांत दोडके करीत आहे.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!