अन्न व औषध प्रशासन अमरावती विभागाची कारवाई.
जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
जळगांव जामोद पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुप्त माहितीच्या आधारे बऱ्हाणपूर महामार्गावर रसुलपूर फाट्यानाजीक दि.७ रोजी सापळा रचून एका वाहनातून अन्न व औषध प्रशासनाने सुमारे १७ लक्ष रुपयांचा सुगंधित गुटखा जप्त केला आहे.
मध्यप्रदेश मधून जळगांव जा कडे गुटखा घेऊन वाहन येत असल्याची गुप्त माहिती अन्न व औषध प्रशासन अमरावती विभागाला मिळाली.त्यानुसार विभागाने सकाळी ८ च्या दरम्यान बऱ्हाणपूर महामार्गावर रसुलपूर फाट्यानाजीक सापळा रचून अशोक लेलँड वाहन क्रमांक एम.एच २८ बी.बी ६८८७ या वाहनांमधून १७ लाख ३३ हजार ७५० रुपयांचा गुटखा जप्त केला.वाहनाची किंमत ८ लक्ष रूपये व अवैध गुटखा असा सुमारे २५ लक्ष रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.गुटखा वाहतूक करणारा आरोपी परमेश्वर निर्मळे रा.देऊळगाव राजा जिल्हा.बुलढाणा याला जळगाव पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून अन्नसुरक्षा अधिसूचना उल्लंघन कलम ५९ नुसार अन्नसुरक्षा व मानके कायदा २००६ अन्वये तसेच सहकलम २७२,२७३,१८८ व ३२८ भा.द.वी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नारायण सरकटे हे करीत आहेत.सदरची कारवाई अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त दक्षता मुंबई समाधान पवार, सहआयुक्त दक्षता आनंद महाजन, सह आयुक्त अमरावती विभाग जयपुरकर, सहआयुक्त बुलढाणा केदारे,अन्नसुरक्षा अधिकारी अमरावती विभाग संदीप सूर्यवंशी,गुलाबसिंग वसावे,रवींद्र सोळंके,वाहन चालक देशमुख बाप्पू तसेच जळगांव जामोद पोलीस स्टेशनचे पो.हे.कॉ. उमेश शेगोकार,पो.ना. शेख इरफान,पो.कॉ.सचिन राजपूत,पऱ्हाड, रंजीत व्यवहारे यांनी केली.
Add Comment