Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

जळगांव जामोद तालुकाध्यक्षपदी प्रकाश वाघ यांची फेरनिवड.

Spread the love

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

खामगाव जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत जळगांव जामोद तालुकाध्यक्षपदी प्रकाश वाघ यांची फेरनिवड करण्यात आली.

बैठकीला भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष चैनसूख संचेती आ.डॉ.संजय कुटे,आ.आकाश फुंडकर,जिल्हाध्यक्ष सचिन बाप्पू देशमुख,लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे,मोहन शर्मा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकासाच्या नव्या उंचीवर पोहचला आहे.मोदीजींचे हात बळकट करून मोदीजींना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्याची जबाबदारी स्वीकारून काम करण्याचे आवाहन डॉ.संजय कुटे यांनी केले.

बैठकीत संघटनात्मक नियुक्तया करण्यात आल्या यामध्ये जळगाव जामोद तालुका अध्यक्ष पदी प्रकाश वाघ, जळगाव जामोद शहर अध्यक्ष पदी कैलास पाटील,शेगाव तालुका अध्यक्षपदी राजेंद्र हेलगे,शेगाव शहरअध्यक्ष पदी ज्ञानेश्वर साखरे,संग्रामपूर तालुका अध्यक्ष पदी लोकेश राठी यांची नियुक्ती करण्यात आली.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!