Editor Choice Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

“या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे.”या गाण्यावर रसिकांची दाद.

Spread the love

आ.डॉ.संजय कुटेची स्वर गुरुकुंजच्या गायकांना साथ.

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकारसंघाच्या अधिवेशनात आयोजित स्वर गुरुकुंजच्या या सदाबहार संगीताच्या कार्यक्रमात “या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” या गाण्यावर रसिकांची दाद मिळाली. या गाण्यात स्वर कुंजच्या गायकांना मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी साथ देत उपस्थितांची मने जिकली.

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाद्वारे स्थानिक देवशीष लॉन येथे पत्रकारांचे एक दिवसीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उदघाटक म्हणून माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे हे होते तर जळगांव जामोद चे सुपुत्र लोकमत चे सहयोगी संपादक यदु जोशी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.अधिवेशनाच्या पहिल्या सत्रा अगोदर राज्यभरातून आलेल्या पत्रकारांसाठी श्रीगुरुदेव मानवसेवा छात्रालय गूरुकुंज आश्रम प्रस्तुत ‘स्वरगुरुकुंजाचे’ च्या सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.अधिवेशनाचे उदघाटन केल्यानंतर मान्यवरांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली.यावेळी मंगेश पाडगावकर यांच्या या”जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे” या गाण्यात मतदारसंघाचे आ.डॉ.संजय कुटे यांनी स्वरकुंजच्या गायकांना साथ दिली.यावेळी राज्यभरातून आलेल्या पत्रकारांना आ.डॉ.संजय कुटे यांच्यातील गायक दिसून आला व त्यांच्या गाण्याला रसिक पत्रकारांनी दाद दिली. आ.डॉ.कुटेच्या गायनाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहे. काही दिवसांपूर्वी “मिले सूर मेरा तुम्हारा” हे गाणंही समाज माध्यमांवर फिरत युवकांची पसंती मिळवत असल्याचे दिसुन आले.

श्रीगरुदेव मानवसेवा छात्रालय गूरुकुंज आश्रम प्रस्तुत ‘स्वरगुरुकुंजाचे’ चे संयोजक,निवेदक अमोल बांबल हे होते तर अनुराग बाभुलकर,चेतन अंभोरे,हितेश विटाळे, श्रवण सोनटक्के,तबलावादक राम जोंधळे,ढोलक वादक प्रेम पडघाम,ऑर्गन वादक अनिकेत दूतंडे,पॅड वादक ज्ञानेश्वर धनभर,हार्मोनियम वादक,आकाश वानखडे यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.या कार्यक्रमामध्ये मधे अभंग,खंजेरी भजन, गोंधळ,पोवाडे,लोकगीत,कव्वाली, देविगीत,राष्ट्रभक्ती गीत,भावगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली.

श्री गुरुदेव आश्रमात हे विद्यार्थी शिक्षण घेत सोबतच आपली गायन कला जोपासत आहेत.यातील काहींनी वेगवेगळे पुरस्कारही प्राप्त केले आहेत.’स्वर गुरुकुंजचे’ ला आम्ही जळगांवकरांची दाद मिळाली.

error: Content is protected !!