साडेतीन हजार ब्रास रेती साठा उपलब्ध : डॉ.शशिकांत खेडेकरांच्या प्रयत्नांना यश.

देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी :
नागरिकांना स्वस्त दराने रेती उपलब्ध व्हावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून डॉ.शशिकांत खेडेकर यांनी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे व विभागीय आयुक्तांकडे वेळोवेळी पाठपुरावा केला.त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून आता परिसरातील नागरिकांना ६०० प्रति ब्रास स्वस्त दरात रेती साडेतीन हजार ब्रास उपलब्ध झाली आहे.
शासनाने रेतीचे उत्खनन,साठवणूक ऑनलाईन प्रणालीद्वारे विक्री करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ व हिवरखेड पुर्णा घाटासाठी टाकरखेड वायाळ येथे तर राहेरी खुर्दसाठी राहेरी खुर्द येथे डेपो कार्यान्वीत करण्यात आला आहे.टाकरखेड वायाळ व राहेरी बु. डेपोमधून ३ हजार ६७० ब्रास रेती सामान्य जनतेसाठी शासनाच्या धोरणाप्रमाणे ६०० रुपये प्रति ब्रास या दराने उपलब्ध करून देण्यात आली आहे.नागरिकांनी ऑनलाईन पद्धतीने सेतू सुविधा केंद्र किंवा ई महासेवा केंद्रातून महाखनिज प्रणालीवर वाळूची ऑनलाईन मागणी नोंदवून शासनाच्या या धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले आहे.












