देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

देऊळगाव महि च्या मातीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे. …. समाधान शिंगणे

Spread the love

सहकार विद्या मंदिर येथे वार्षिक क्रिडा स्पर्धेला सुरुवात.

देऊळगाव मही|समर्थ भारत मराठी :

देऊळगाव मही परिसराच्या मातीत अनेक दर्जेदार खेळाडू आहेत त्यांना योग्य व्यासपीठ,योग्य संधी मिळाल्यानंतर प्रोत्साहन मिळत नाही.विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्यासाठी त्यांच्यातील कला,क्रिडा गुण जोपासण्यासाठी सहकार विद्या मंदिर हि शाळा सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असते.या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून देऊळगाव मही परिसराच्या मातीतून दर्जेदार खेळाडू निर्माण व्हावे असे प्रतिपादन देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती समाधान शिंदे यांनी अध्यक्षीय भाषणात बोलताना केले.

सहकार विद्या मंदिर येथे दि.४ व ५ रोजी वार्षिक क्रिडा सप्ताह आयोजित करण्यात आला.या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अलका गोडे,डॉ.महेश दंदाले,देऊळगाव मही अर्बन पतसंस्थेचे अध्यक्ष प्रवीण कोटेचा,आर.एन.राठोड,सुरज बढे,  शेख,पत्रकार सुनील मतकर,संतोष जाधव,प्रकाश साकला, राम पऱ्हाड,अमोल बोबडे,श्रीकृष्ण देशमाने,शाळेचे मुख्याध्यापक सचिन खरात उपस्थित होते.

या वेळी विद्यार्थ्यांनी शालेय अभ्यासक्रमाबरोबरच आपले क्रिडागुण जोपासत क्रिडा क्षेत्रात या पूर्वीच राज्यस्तरापर्यंत नाव लौकिक मिळविलेला आहे हि सात्यतता अशीच कायम राहावी असे प्रतिपादन समाधान शिंगणे यांनी केले.डॉ. अलका गोडे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.डॉ.महेश दंदाले यांनी आरोग्याच्या दृष्टीने जीवनातील खेळाचे महत्व विशद केले.कार्याक्रमाचे सूत्रसंचलन केशव तळेकर यांनी तर आभार प्रदर्शन मंगेश खिल्लारे सर यांनी केले.कार्यक्रमा च्या यशस्वीत्यासाठी शिक्षकवृंदानी,शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!