देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा

ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन फ्रेंडली क्रिकेट कप ‘सिझन पहिला’ उत्साहात संपन्न.

Spread the love

खामगाव मेमन जमात संघाने पटकाविले पहिल बक्षिस.

देऊळगावराजा|समर्थ भारत मराठी :

आजच्या धकाधकीच्या युगात युवा वर्गात ३१ डिसेंबरचा दिवस अति महत्वाचा मानला जातो.युवा पिढीतील युवक विविध प्रकारे नववर्षाचं स्वागत करतात.परंतु मेमन समाजाच्या मुलांनी युवकांसाठी एक नवीन आदर्श देत ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन फ्रेंडली क्रिकेट कप सिझन पहिला क्रिकेट सामन्यांचे आयोजन करुन समाजाला वेगळा संदेश दिला आहे. संध्याकाळी ५ ते रात्री १२ पर्यत चालेल्या या क्रिकेट सामन्यात खामगाव मेमन जमात संघाने पहिले बक्षिस तर मलकापूर मेमन जमात संघाने दुसरे बक्षिस पटकावले.

ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनचे अध्यक्ष हाजी इकबाल मेमन,युथविंग चेअरमॅन इम्राण फ्रुटवाला आणि स्पोर्ट विंग चेअरमॅन आसीफ अबाजुम्मा यांच्या मार्गदर्शनात डोंगरे टर्फ बुलडाणा येथे क्रिकेट सामान्यांचे आयोजन करण्यात आले होते.या सामन्यात प्रमुख पाहूणे म्हणून ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशनचे बुलडाणा झोनल सेक्टरी अशरफ पटेल, बुलडाणा मेमन जमातचे सचिव मोहम्मद ठेकीया,चिखली मेमन जमातचे सचिव साजिद राव आणि बुलडाणा मेमन जमातचे मान्यवर उपस्थित होते.या क्रिकेट सामन्यात मलकापुर मेमन जमात,चिखली मेमन जमात,खामगाव मेमन जमात,बुलडाणा मेमन जमात,मेहकर मेमन जमातच्या युवकांनी सहभाग नोंदविला होता.दि.३१ डिसेंबर रोजी या क्रिकेट सामन्याचा आयोजन करुन बुलडाणा मेमन जमात युथविंगने एक वेगळा संदेश युवकांना दिला आहे.

या स्पर्धेचा अंतिम सामना खामगाव मेमन जमात युथविंग आणि मलकापूर मेमन जमात युथविंग मध्ये झाला.खामगाव ममेन जमात युथविंगने अतिशय रोमांचक सामना जिंकला आणि प्रथम बक्षिस पटकावले तर मलकाूपर मेमन जमात युथविंग ने दुसरे बक्षिस पटकावले.या र्टुनामेंटच्या प्लेयर ऑफ दी सिरीज च बक्षिस खामगावचे सहलीम मेमन,बेस्ट बॅटसमॅन मलकापुरचे सोहेल मकवाना तर उत्कृष्ट गोलदांज म्हणून चिखलीचे असलम मेमन यांना मिळाले.विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस,ट्रॉफी वितरीत करण्यात आली.या सामने यशस्वी करण्यासाठी बुलडाणा मेमन जमात युथविंगचे चेअरमन अशफाक ठेकिया,नुरमोहम्मद परयाणी,मोहम्मद हुसैन मेमन,समिर शिवानी आणि बुलडाणा मेमन जमात आणि युथविंगचे सदस्यांनी परिश्रम घेतले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!