राज्यभरातील पत्रकार बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन.
जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे एकदिवसीय खुले राज्यस्तरीय अधिवेशन ४ जानेवारी २०२४ रोजी जळगाव जामोद येथील बऱ्हाणपूर रोडवर असलेल्या ‘देवाशिष लॉन्स’ येथे आयोजित केले आहे.या अधिवेशनाचे आयोजक अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ असून संयोजक म्हणून जळगांव जामोद तालुका पत्रकार बांधव राहणार आहेत.
या अधिवेशनाचे उद्घाटन माजी मंत्री तथा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आ.डॉ. संजय कुटे यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा.प्रतापराव जाधव यांची उपस्थिती लाभणार आहे.खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आ.आकाश फुंडकर,राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष तथा दै. लोकमत मुंबईचे सहयोगी संपादक यदु जोशी,आय.एन.एस. समितीचे कार्यकारी सदस्य तथा दै. हिन्दुस्थानचे प्रबंध संपादक विलास मराठे,अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे सदस्य तथा दै.वृत्तकेसरी अमरावतीचे संपादक जयराम आहुजा आदींची उपस्थिती राहणार आहे.
अधिवेशनाच्या व्दितीय सत्राला प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉ.स्वाती संदिप वाकेकर, कृ.उ.बा. जळगावचे सभापती प्रसेनजीत पाटील, राजर्षी शाहु परिवार तथा संकल्पक वन बुलढाणा मिशनचे अध्यक्ष संदिप शेळके,नागपूर विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष रमेश कुळकर्णी, दै. महासागरचे संपादक श्रीकृष्ण चांडक, अमरावती विभागीय अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष रवींद्र लाखोडे,अमरावती विभागीय अधिस्विकृती समिती सदस्य राजेंद्र काळे बुलढाणा, सुरेंद्रकुमार आकोडे, गोपाल हरणे यांची उपस्थिती राहणार आहे.
अधिवेशनाचं समारोपीय सत्र दु. ४ ते दु. ५ पर्यंत राहणार आहे. या सत्राच्या अध्यक्षस्थानी अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने राहणार असून प्रमुख उपस्थिती म्हणून अ.भा. ग्रामीण पत्रकार संघाचे केंद्रीय कार्याध्यक्ष युसुफ खान यांची उपस्थिती राहणार आहेत. यादरम्यान अधिस्विकृती बाबत मार्गदर्शन व आजची पत्रकारीता या विषयावर राज्य पत्रकार अधिस्विकृती समितीचे अध्यक्ष यदु जोशी हे मार्गदर्शन करणार आहे.
अधिवेशनाला राज्यातील सर्व पत्रकार बंधुनी उपस्थित राहावे असे आवाहन संस्थापक अध्यक्ष मनोहर सुने,केंद्रीय कार्याध्यक्ष युसूफ खान,केंद्रीय महासचिव सुरेश सवळे, केंद्रीय सचिव अशोक पवार, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासबापू देशमुख,महिला मंच प्रदेश अध्यक्ष जयश्री पंडागडे,केंद्रीय उपाध्यक्ष राजेंद्र भुरे,केंद्रीय कोषाध्यक्ष अशोक यावूल,केंद्रीय सदस्य माणिक ठाकरे, प्रदीप जोशी, केंद्रीय विधी सल्लागार ॲड.किरण भुते,केंद्रीय संपर्क प्रमुख प्रा. रवींद्र मेंढे,केंद्रीय सदस्य बाळासाहेब सोरगीवकर,संजय कदम,मिना राहीज, जोशीला पगारीया,वर्षा घाडगे,कांचन मुरके,भावना सरनाईक, अनुप गवळी,प्रताप मोरे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष व अ. भा. ग्रा. पत्रकार संघ, जळगाव (जामोद) तालुका कार्यकारीणी , “आम्ही जळगांवकर” पत्रकारांनी केले आहे.
Add Comment