Maharashtra जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

विविध मागण्यांसाठी स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे धरणे आंदोलन.

Spread the love

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

जळगाव जामोद तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने दि.०१ रोजी स्थानिक तहसील कार्यालयासमोर आपल्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले व तहसीलदारामार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्यावतीने विविध मागण्यांसाठी संपूर्ण राज्यात स्वस्त धान्य दुकानदार एक दिवसीय धरणे आंदोलन करीत आहेत.कालबाह्य झालेल्या ई-पॉस मशीन बदलून फाइव्ह जी मशीन देण्यात याव्या,स्वस्त धान्य दुकानदारांना ५० हजार रुपये महिना किंवा १५० ऐवजी ३०० रुपये कमिशन देण्यात यावे.आनंदाचा शिधा हा कायमस्वरूपी चालू ठेवावा त्यामध्ये कांदा,चणाडाळ,तुरडाळ या वस्तूंचा समावेश करावा. स्वस्त धान्य दुकानदारांना सीएससी सेंटर व सेतू केंद्र देण्यात यावे.  अन्नसुरक्षाचा इष्टांक वाढवून देण्यात यावा. या मागण्यांकरिता जळगाव जामोद स्वस्त धान्य दुकानदार संघटनेतर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर दाताळकर, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रंगराव देशमुख, गजानन वाघ,निलेश देशमुख,अरुण साबळे,शालिग्राम दाते,संजय देशमुख,अरुण पारवे,हरिदास इंगळे,वैभव जोजार,गजानन बाठे,रामकृष्ण तायडे तालुक्यातील बहुसंख्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!