माजी आ.डॉ.शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसाच निमित्त.
देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी :
मातृतीर्थ सिदखेडराजा विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगा घेऊन आणण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेले व्यक्ती म्हणजे मतदारसंघाचे माजी आ.डॉ.शशिकांत खेडेकर.त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर देखील ते सतत विकास निधी खेचून आणण्यासाठी मंत्रालयाच्या प्रत्येक दालनात दिवसभर फिरत असतो.मतदार संघातील डझनभर कार्यकर्ते सतत सोबत असतात.प्रत्येक कार्यकर्त्याला मंत्र्याची भेट घडवून आणून त्यांच्या समस्या मार्गी लावण्याचे काम डॉ.शशिकांत खेडेकर करीत असतात.मंत्रालयात डॉ.खेडेकर यांच्यासोबत सर्वाधिक गर्दी नेहमी मंत्रालयात पाहायला मिळत असते त्यामुळे हारणे वालो को भी बाजीगर कहते है! अशी स्तुती सुमने राज्याचे अल्पसंख्यांक व पणन मंत्री नामदार अब्दुल सत्तार यांनी देऊळगाव राजा येथे डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित क्रिकेट सामन्यांच्या समारोप प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना सांगितले.

यावेळी माजी आ.तोताराम कायंदे,भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ,अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाप्रमुख सिद्दिक कुरेशी,डी टी शिपने,जगदीश कापसे दीपक पवार, विजय देव,उपाध्ये,ऍड.सतीश नरोडे,जनार्दन मोगल,संतोष खांडेभराड,मारुती बंगाळे, सलीम पठाण,गोपाळ व्यास, अतिश तायडे,बाळू म्हस्के,नंदन खेडेकर,श्रीनिवास खेडेकर, डॉ.भाग्यश्री खेडेकर,शंकर तलबे,अनिल रामाने,राजू कांबळे,संचालक अभय दीडहाते,अतिश खराट,सचिन व्यास,मुन्ना तिडके,राजेश सपाटे,प्रतीक चव्हाण,यांच्यासह मान्यवर मंडळी उपस्थित होते.
“विधिमंडळात असताना सिंदखेड मतदार संघासाठी मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला.एक आगळी वेगळी ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला.मात्र मागील तीन वर्षात मतदार संघाचा विकास ठप्प झाला होता.या तीन वर्षात मतदार संघात कुठलीच कामे झाली नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात मागील तीन वर्षाचा विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याचा प्रयत्न आहे.येणाऱ्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,खासदार प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी मिळणार आहे.”
……. डॉ. शशिकांत खेडेकर.
रुद्रा इलेव्हन,चिखली ठरली विजयाची मानकरी :-
क्रिकेट खेळाचा मोठा वर्ग देऊळगाव परिसरात असल्याने या परिसरामधील खेळाडूंना वाव मिळावा यासाठी दर्जेदार क्रीडा स्पर्धेचे आयोजन शिवसेनेच्या वतीने करण्यात आले होते यास्पर्धेसाठी मावळा क्रिकेट क्लब च्या वतीने पुढाकार घेण्यात आला होता.नावाजलेले संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. अंतिम सामना आदर्श सीसी जालना विरुद्ध रुद्र एलेवन चिखली असा झाला होता यामध्ये रुद्र इलेव्हन चिखलीने एक लाख रुपयाचे पारितोषिक पटकावले तर आदर्श सीसी जालना याला ५१ हजार रुपये दुसरे पारितोषिक मिळाले ही स्पर्धा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.













