देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी :
आज मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यभरात रान पेटवल्या जात आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी आमची देखील भूमिका आहे मात्र ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे जर मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लावला तर याचे गंभीर परिणाम सरकारला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भोगावे लागतील असा गर्भित इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री महादेव जानकर यांनी तालुक्यातील असोला येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना दिला.

पुढे बोलतांना आ.जानकर म्हणाले,या देशात जात निहाय जनगणना करण्यात यावी अशी मागणी होत असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मात्र जातनिहाय जनगणनेला विरोध केला आहे.एकीकडे या देशात जनावरांची जनगणना होते, मात्र या देशात माणसांची जनगणना होत नाही हे फार दुर्दैव आहे.ओबीसींची जातिनिहाय जनगणना झाली पाहिजे यासाठी ओबीसी जाती मधील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे आहे.ओबीसीचे आरक्षण टिकण्यासाठी ओबीसींनी एकत्र येऊन राजकीय ताकद वाढवणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने पुढच्या काळात जिद्दीने प्रयत्नांची आवश्यकता असून राष्ट्रीय समाज पक्ष हा ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी एक पाऊल पुढे असणार आहे.देशात ओबीसींच्या कैवारी एकच वाघ होता त्याचं नाव स्व. गोपीनाथ मुंडे होते.आज गोपीनाथ मुंडे असते तर त्यांनी राजकीय पक्षाचे बंधने तोडून ओबीसी समाजासाठी लढा उभारला असता आणि त्या लढ्यात छगन भुजबळ यांच्याबरोबर राष्ट्रीय समाज पक्ष खांद्याला खांदा लावून लढला असता.एकीकडे आपण आरक्षण टिकविण्यासाठी लढा उभारत आहे तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात खाजगीकरण करण्यावर भर दिला आहे.जर सर्व क्षेत्रात खाजगीकरण झाले तर या आरक्षणाचा उपयोग तरी काय असणार आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेने सज्ज होऊन निवडणुकीत प्रस्थापित पक्षांना धडे शिकवून राष्ट्रीय समाज पक्षाच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना ही उपेक्षित समाजाला अपेक्षित ठिकाणी नेण्यासाठी झाली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रीय समाज पक्षाची राजकीय घोडदौड असणार असल्याचे देखील यावेळी महादेव जानकर यांनी सांगितले
कार्यक्रमाला प्रमुख्याने राष्ट्रीय समाज पक्षाचे विदर्भ उपाध्यक्ष तथा अमरावती विभागाचे विभागीय अध्यक्ष डॉ.तौसीफ शेख, बुलढण्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर डोईफोडे,अकोल्याचे जिल्हाध्यक्ष गणेश मानकर,जिल्हा संपर्कप्रमुख बुलढाणा अतुल भुसारी पाटील,महिला अध्यक्ष तारामती जायभाये, सिंदखेडराजा तालुका अध्यक्ष संतोष वनवे,जिल्हाउपाध्यक्ष राजू चव्हाण,तालुकाध्यक्ष उमेश इच्चे,तालुकाप्रमुख सुनील मांटे,विध्यार्थी युवक आघाडी तालुकाध्यक्ष वैभव मांटे,युवक आघाडी उपाध्यक्ष सचिन चित्तेकर,सोशल मीडिया तालुका अध्यक्ष योगेश मांटे,अनिल पवार यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.कार्यक्रमा चे आयोजन बुलढाणा जिल्हाध्यक्ष प्रभाकर डोईफोडे व असोला जहागीर येथील गावकरी मंडळीनी केले होते.
Add Comment