देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी :
भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्यांसाठी कार्यरत असणारा पक्ष असून केवळ निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन पक्षाची वाटचाल नाही.त्यामुळेच निवडणूका असो वा नसो सर्वसामान्यांशी संपर्क सातत्याने ठेवण्यासाठी पक्षासाठी संघटनेच्या माध्यमातून विविध कार्यक्रम हाती घेण्यात येत असतात.याचाच एक भाग म्हणजे एक बुथ ११ ओ.बी.सी हे अभियान देशाच्या पंतप्रधानपदी तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी यांना विराजमान करण्यासाठी राबविण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा लोकसभेचे प्रभारी डॉ.सुनील कांयदे यांनी दिली.

पुढे बोलताना डॉ.कांयदे यांनी सांगितले की,हे अभियान भाजपच्या संघटन वाढीसाठी एक प्रभावी माध्यम आहे. बूथ अभियान म्हणजेच भाजपच्या क्षमतावान कार्यकर्त्यांचे केंद्रस्थान आहे.प्रत्येक बूथवर मतदारांच्या संपर्काची धुरा भाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी खांद्यावर घ्यावी. संपर्काच्या माध्यमातून प्रत्येक बूथ समर्थ व्हावा यासाठी प्रयत्न करावे. बूथ हाच भाजपच्या संघटनेचा आत्मा आहे. आगामी निवडणुका केव्हा जाहीर होणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क साधावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशहितासाठी केलेल्या कार्याची दखल जनता नक्कीच घेईल व पुन्हा त्यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदी नक्कीच विराजमान करतील असा विश्वास यावेळी डॉ.सुनील कायंदे यांनी व्यक्त केला
ओ.बी.सी मोर्चा कार्यकारणी जाहीर.
भारतीय जनता पार्टी ओ.बी.सी मोर्चा महा विजय २०२४ च्या अनुषंगाने भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे,भाजप ओ.बी.सी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते,माजी आ.चैनसुख संचेती,आ.डॉ.संजय कुटे,आ.आकाश फुंडकर,आ.श्वेता महाले,भाजप जिल्हाध्यक्ष गणेश मांटे,सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनात लोकसभा क्षेत्रातील ओ.बी.सी मोर्च्याचे विधानसभा क्षेत्रातील नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. यामध्ये विधानसभा प्रमुख डीगंबर शालिग्राम हिवरकर,जळगाव जामोद. संजय देविदास महाले,चिखली.केशव लक्ष्मण बाहेकर,मेहकर.पांडुरंग बाजीराव जायभाये,सिंदखेड राजा. तर सहसंपर्कप्रमुख पदी राजेंद्र अरुण शिंदे,सिंदखेडराजा.बापूराव शंकर केळकर, सिदखेडराजा.गोपाल रंगनाथ पाझडे,सिदखेडराजा.राजेश बाकीलाल पवार,सिदखेडराजा.सुरेश एकनाथ निकस,मेहकर. नितीन श्रीराम काळे,मेहकर.किशोर रामदास चव्हाण, मेहकर. संजय शिवकुमार डोळे,मेहकर यांची निवड भारतीय जनता पक्षाचे ओ.बी.सी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा बुलढाणा लोकसभा प्रमुख डॉ.सुनील कायंदे यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
Add Comment