चिखली बुलढाणा जिल्हा

अयोध्येहून आलेल्या मंगल अक्षता कलशांचे वितरण.

Spread the love

चिखली|समर्थ भारत मराठी :

आगामी पौष शुक्ल द्वादशी अर्थात २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येतील बहुप्रतीक्षित श्रीराम मंदिरात प्रभू रामचंद्र अर्थात श्री रामलला नुतन मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. दि. १७ रोजी अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीने बुलढाणा जिल्ह्यातील २३ उपखंड आणि ६ नगर स्थानावरील अभियानाच्या संयोजक, सहसंयोजकांनी विभाग संघचालक चित्तरंजन राठी,जिल्हा संघचालक सुभाष मोरे, विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री आणि अभियान संयोजक माधव धुंदाळे, सहसंयोजक सुहास कुळकर्णी, शिवाजी भालतीलक यांचेकडून विधिवत पूजा करून सिद्ध केलेल्या अक्षतांचा कलश स्वीकारला.

या अक्षता कलशांचे जिल्ह्यातील सर्व उपखंड / नगर स्थानांवर अक्षता कलश पूजनाचा कार्यकम दिनांक २४ आणि २५ डिसेंबर रोजी संपन्न होणार आहे.उपखंड, नगर स्थानावरील पूजन कार्यकम संपन्न झाल्यानंतर ग्राम, वस्ती निहाय अक्षता कलश पूजन कार्यकम होणार आहेत; आणि त्यानंतर आमंत्रण म्हणून रामभक्ताकडून देशभर १ ते १५ जानेवारी दरम्यान व्यापक जनसंपर्क होणार आहे. या अक्षता घरोघरी देण्यात येणार आहेत. अयोध्येत मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी सर्व भाविकांना उपस्थित राहणे शक्य नसल्याने ‘ मेरा गांव मेरी अयोध्या, मेरी बस्ती मेरी अयोध्या ’ या संकल्पनेनुसार भाविकांनी आपले गाव, आपला परिसर, घरीदारी धार्मिक अनुष्ठान, नामसंकीर्तन करीत स्थानिक मंदिरात महाआरती, प्रसाद वितरण करून लोकार्पण सोहळ्याचे थेट प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर दाखवून आनंदोत्सव साजरा करावा असे आवाहन श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास ने केले आहे.यानिमित्त परिसरात रांगोळ्या, घरांवर भगवे ध्वज आणि पताका लावून परिसर सुशोभित करावा; तसेच सायंकाळी घरांसमोर किमान पाच दिवे प्रज्वलित करून दीपोत्सव साजरा करावा, २२ जाने २०२४ ला मंदिर केंद्रीत कार्यक्रम सर्व गावात व वस्तीत होणार आहेत सर्व रामभक्तांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास पवित्र अक्षदा वितरण अभियान जिल्हा संयोजक,विश्व हिंन्दू परिषदेचे जिल्हा मंत्री माधव धुंदाळे यांनी केले आहे.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!