Education Uncategorized जळगांव जामोद बुलढाणा जिल्हा

बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये एकदिवसीय कार्यशाळा संपन्न.

Spread the love

जळगांव जामोद|समर्थ भारत मराठी :

बापुमिया सिराजोद्दीन पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील उद्योजकता विकास कक्ष , वाणिज्य विभाग व आय. क्यू. ए.सी. यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १६ डिसेंबर २०२३ रोजी स्टार्टअप बिझनेस आयडिया या विषयावरती व नवीन उद्योजकाला चालना मिळण्यासाठी एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. 

कार्यक्रमासाठी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय वरवट बकाल येथील वाणिज्य विभागातील सहाय्यक प्राध्यापक सुरेश रमेश भालतडक हे प्रमुख वक्ता म्हणून उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना आजच्या जगामध्ये नवीन व्यवसाय कसा सुरू करावा व त्यात प्रगती कशी करावी याबद्दल विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती दिली व तो उभारण्यासाठी भारत सरकार द्वारे देण्यात येणाऱ्या विविध अनुदानाची संपूर्ण माहिती त्यांनी दिली. 

कार्यक्रमाला गणित विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक एम. डी. नेतनस्कर यांनी अध्यक्षस्थान भूषवले  व वाणिज्य विभागातील सहाय्यक प्राध्यापक गोपाल हिस्सल,विकास इसोकार, कु. रुपाली आंबेकर व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.कार्यशाळेचे आयोजन उद्योजकता विकास चे समन्वयक डॉ.चेतन पलन  यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राध्यापक अमोल वानखेडे यांनी केले.

About the author

समर्थ भारत मराठी

Add Comment

Click here to post a comment

error: Content is protected !!