शेतकऱ्यांच्या विषयावर विधानभवनात प्रश्न; कृषिमंत्र्यांनी दिला कारवाईचा शब्द.
देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी :
अग्रीम पिक विमा वितरित करत असताना इतर जिल्ह्याच्या तुलनेत बुलढाणा जिल्ह्याला सर्वात कमी विम्याच्या अग्रीम रक्कमेबाबत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सिंदखेडराजा मतदारसंघाचे आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी प्रश्न उपस्थित करत, त्याची कारणे काय? व यावर शासन स्तरावर काय निर्णय घेतला जाईल? याबद्दलचा प्रश्न उपस्थित केला.

शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम जमा झालेली असताना त्यावर काही बँकांनी होल्ड लावलेला आहे त्यावर काय कारवाई करणार? असे प्रश्न आ. डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी उपस्थित केले असता कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी अग्रीम पिक विमा बाबत सविस्तर माहिती घेऊन कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
तसेच ज्या बँकांनी शेतकऱ्याच्या पिक विमा रकमेवर होल्ड लावले आहेत त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देणार असून जर त्यांच्याकडून कारवाई झाली नाही तर स्वतः शासन अशा बँकांवर कारवाई करेल असा शब्द देखील कृषिमंत्र्यांनी यावेळी आपल्या उत्तरामध्ये दिला.













