देऊळगाव मही|समर्थ भारत मराठी :
आपण समाजाचे काही देणे लागतो या उदात्त हेतूने समधानदादा शिंगणे युवा प्रतिष्ठानने गावातीलच अत्यंत हालाखीची परिस्थिती असलेल्या स्वराज व युवराज च्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांच्या अंधकारमय जीवनात शिक्षणाचा प्रकाश टाकला आहे.

गावातील भानुदास शिराळे यांनी मोलमजुरी करून बहिणीचा विवाह दहा वर्षांपूर्वी लावून दिला होता.संसार सुरळीत सुरू असतांना व्यसनाधीन पतीला कंटाळुन देऊळगाव मही येथे त्यांची बहीण आपल्या स्वराज व युवराज दोन मुलांसोबत भावाच्या घरी राहायला आली होती. पण भावाची परिस्थिती पाहून बहिणीने काही महिन्यांपूर्वी आपली जीवनयात्रा संपविली.आई वडील नसल्याने पोरके झालेले स्वराज व युवराज यांच्या उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न त्यातच शिक्षणाचा मार्गही अंधारमय झालेला पाहून परिसरातील सामाजिक कार्यात फाउंडेशनच्या माध्यमातून अग्रेसर असणारे समाधान भिकाजी शिंगणे यांनी पुढाकार घेत आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने त्या चिमुकल्यांचा शिक्षणाचा मार्ग प्रकाशमय करण्याचा निर्धार करून त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना धनादेश देवून भरीव मदत केली. यावेळी समाधानदादा शिंगणे युवा प्रतिष्ठानचे विश्वस्त रामकिसन म्हस्के,अंनता इंगळे,अभिजीत शिंगणे,धर्मा खिल्लारे,अनिरुद्ध शिंगणे,सुनील मतकर, संतोष जाधव,राम पऱ्हाड,अमोल बोबडे,अनिल शिंगणे,किशोर शिंगणे,रवि मुळे,प्रसाद निठवे,निखील शिंगणे,लक्ष्मण शिंदे,सचिन आंधळे, रंगा शिंगणे, ज्ञानु शिंगणे,ज्ञानु वाघ, राम शिंगणे, बंटी मोरे,कृष्णा जाधव,निशांत देशमुख,रमेश वायाळ,सचिन शिंगणे,मंगेश शिंगणे,अनु शिंगणे,आकाश शिंगणे,संकेत शिंगणे,कैलास शिंगणे,भागवत शिंगणे,अक्षय शिंगणे,प्रमोद शिंगणे,दीपक शिंगणे,किरण राऊत यांच्यासह समधानदादा शिंगणे प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते.
Add Comment