Agriculture News Maharashtra देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा

शेतकऱ्यांना खजुराची शेती भविष्यात वरदान ठरणार : कुलगुरू डॉ.शरद गडाख.

Spread the love

◆डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ व ईश्वेद समूहांमध्ये लवकरच होणार करार.◆

◆नवीन पिकांच्या संशोधनाला मिळणार चालना.◆

देऊळगावराजा|समर्थ भारत मराठी: 

शेतकऱ्यांना खजुराची शेती भविष्यात वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.शरद गडाख यांनी ईश्वेद टिश्यू कल्चरचे तयार होत असलेले खजूरांच्या रोपांची पाहणी करतांना केले.

पुढे बोलतांना डॉ.गडाख म्हणाले,खजूर शेती शेतकऱ्यांना फायदेशीर असुन नापीक व खडकाळ जमिनीमध्ये लागवड करून त्यातुन उत्पन्न मिळु शकते.खजुराला चांगल्या प्रकारे भाव असल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती होण्यासाठी मदत होणार आहे.ईश्वेद समूहांकडून तयार करण्यात येत असलेल्या खजुराची रोपांची चांगल्या प्रतीची असुन ओल्या खजुरांना देखील बाजारात चांगला भाव मिळत आहे.माल विक्रीसाठी व्यापारी बांधावर मिळत असल्याने वाहतूक आणि इतरही अनेक खर्च वाचण्यास मदत होणार आहे.

ईश्वेद समूहांकडुन २०२६ पर्यत खजुराची २० लाख रोपे शेतकऱ्यांना मिळणार आहे.ईश्वेद समूहांकडुन भाजीपाला मध्ये मिरची, टोमॅटो, टरबूज, खरबूज, कांदा, भेंडी, वांगी, दोडका,भोपळा,कारले,शिमला मिरची,पालक, कोथिंबीर, गांजर, बीट, मक्का , केळी, चवळी, सूर्यफूल,फूलगोबी,पान गोबी मुळा,वालशेंगा,झेंडू, दुधी भोपळा ,कारले यासह विविध वाणांची, फळबागेमध्ये डाळिंब,सिताफळ, लिंबू, एप्पल बोर, केळी,पेरू,जांभूळ, बांबू,चंदन,मोसंबी,किवी यासह शेकडो फळबागांच्या रोपांची निर्मिती करण्यात येत असुन शेतकऱ्यांकडून त्यांची मागणी जास्त असल्याचे ईश्वेद समुहाचे सीईओ संजय वायाळ यांनी सांगितले. डॉ.पंजाबराव कृषी विद्यापीठ व ईश्वेद समूहांमध्ये करार लवकरच होणार असुन त्यामुळे नविन पिकांच्या संशोधनाला चालना मिळणार आहे.

error: Content is protected !!