Front Maharashtra देऊळगाव राजा बुलढाणा जिल्हा सिंदखेडराजा

सिंदखेडराजा मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध.. डॉ.शशिकांत खेडेकर.

Spread the love

डॉ.खेडेकरांचा मतदार संघात ठिकठिकाणी उत्साहात वाढदिवस साजरा.

देऊळगाव राजा|समर्थ भारत मराठी :

येणाऱ्या काळात सिंदखेडराजा मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी निधी मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस,खासदार प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून मिळवून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं प्रतिपादन माजी आ. डॉ.शशिकांत खेडेकर यांनी केले ते वाढदिवसानिमित्त सत्काराला उत्तर देतांना बोलत होते.

मागील पंचवार्षिक मध्ये सिदखेडराजा मतदारसंघात जनतेच्या आशीर्वादाने विधिमंडळात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली त्या काळात मतदार संघातील पाणी,विज,रस्ते, गावागावातील व तांडा,वस्त्यातील विविध प्रश्नांचा आढावा घेत एक व्हिजन तयार केले.अधिकाऱ्यांना सोबत घेवून प्रस्ताव तयार करून मंञालयात सतत पाठपुरावा करून मतदार संघात कोट्यवधीची कामे मंजूर करून आणली.त्यातील अनेक काम सुरू झाले व काही सुरू होणार आहे.यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभाग ,पर्यटन विकास योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, मूलभूत सुविधा,आमदार स्थानिक विकास कार्यक्रम,जलयुक्त शिवार,अल्पसंख्यांक विकास योजना कार्यक्रम,बळीराजा जलसंजीवनी योजना, राष्ट्रीय महामार्ग रस्ते विकास महामंडळ व केंद्रीय मार्ग निधी, समृद्धी महामार्ग,महाराष्ट्र शासन जलसंधारण महामंडळ, महावितरण विभाग,ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास कार्यक्रम अंतर्गत अनेक तीर्थक्षेत्रांना ब वर्ग दर्जा प्राप्त करणे, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा वार्षिक योजना, आमदार आदर्श ग्राम दत्तक योजना,राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना, स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे ग्रामपंचायत भवन योजना,आरोग्य विभाग,विधी व न्याय विभाग, संत चोखामेळा जन्मस्थळ विकास, मातृतिर्थ विकास आराखडा, क्रीडा विभाग,नदी सुशोभीकरण,दलित वस्ती योजना ,परिवहन विभाग,यांच्यासह खडकपूर्णा प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या सुविधेसाठी मतदारसंघातील कोट्यवधी रुपयांची विकासकामे ही पहिल्यांदा मतदार संघात झाली आहेत. 

वाढदिवसाच्या निमित्ताने देऊळगाव राजा शहरात भगवी रॅली काढण्यात आली, कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक बोरकर,अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाप्रमुख सिद्धीक कुरेशी,जिल्हा परिषद सदस्य डी. टी. शिंपणे,अनिल चित्ते, वैभव देशमुख,गटनेते नंदन खेडेकर,श्रीनिवास खेडेकर, शिवाजी कुहिरे,अशोक कांबळे,ओम पऱ्हाड,संदीप राऊत, स्वप्निल शहाणे,विनोद कोल्हे,गोपाळ व्यास,अनिल चित्ते, विजय देवउपाध्ये,संदीप नागरे,जगदीश कापसे ,मोरेश्वर मीनासे,सलीम पठाण, सचिन व्यास,अभय दीडहाते, आतिश खरात, जितेंद्र साळवे,राजेश सपाटे, प्रशांत राजे जाधव, बंटी सूनगत, अजगर शहा, संतोष बंगाळे, सुभाष सवडे,सचिन भागीले,यांच्यासह मोठ्या प्रमाणात शिवसैनिक  भाजप कार्यकर्ते व पदाधिकारी  उपस्थित होते.

error: Content is protected !!